श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव च्या विद्यार्थ्याचा थक्क करणारा प्रवास, देशपातळीवर नावलौकिक

0
634

जामखेड न्युज—–

श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव च्या विद्यार्थ्याचा थक्क करणारा प्रवास, देशपातळीवर नावलौकिक

श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव येथील विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदकाचा माणकरी,राष्टीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत राष्ट्रीय स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत शाळा, गाव देशात पोहचवले आहे पानिपथ हरियाणा येथे 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत मल्लविद्या कुस्ती संकुल हळगाव येथील पैलवान सुजित संतोष करगळ हा 97 किलो वजन गटामध्ये महाराष्ट्र मध्ये सुवर्ण पदकाचा माणकारी ठरला.राष्ट्रीय स्पर्धेत 1/2 मिनटं वेळ ठेवून 4 कुस्त्या चितपटीने केल्या या स्पर्धेत सुजित करगळ याने महाराष्ट्राचे नेतृत्व करत आपल्या शाळेचे तालमीचे गावाचे नावं देश पातळी वरती पोहचवले आहे.

 

एका शेतकरी कुटुंबातील घरात तीन पैलवान सांभाळणाऱ्या संतोष करगळ यांचा चिरंजीव सुजित याने सर्व कुस्ती विचारवंत मंडळीला विचार करण्यात भाग पाडले आहे. हळगाव सारख्या छोटाश्या गावात कुठलीही अनुकूल परिस्थिती नसताना पत्र्याच्या तालमीत मॅट व इतर सामग्री नसताना देखील सर्व गोष्टींना मात केले.

आपल्या नियमित हनुमंती दंड बैठका, सपाट्या, लढत, कष्टाने व तालमितील वस्ताद यांनी सांगितलेल्या आहार पद्धतीने लाल मातिमध्ये सराव करून मजबूत बांधा तयार केला आणि शालेय कुस्ती स्पर्धेचा प्रवास आपले वस्ताद शकील भैय्या शेख यांच्या सोबत सुरु केला.

प्रथम जामखेड येथे तालुका स्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक, शिर्डी कोकमठाण येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक, काष्टी येथे पुणे विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक, व नेवासा येथे राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रात 97 किलो वजन गटात सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला यावेळी कोल्हापूर विभागचा खेळाडू अजीज सय्यद 7 गुण / पुणे विभागचा सुजित करगळ 8 गुण अशी तुल्यबल झाली या स्पर्धेतील ही कुस्ती प्रेक्षनीय व चुरशीची झाली.

राष्ट्रीय स्पर्धेकरिता ही लढत निर्णायक ठरली यामध्ये सुजित ने 8/7 च्या कडवी झुंज देत विजयी कुस्ती केली व प्रेक्षकांची मने जिंकली. पुढील फेरीत हरियाणा पानिपथ येथे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचे नेतृत्व केले. आपल्या शालेय जीवनातील पहिल्याच धडकेत देशात चौथ्या क्रमांकाची मजल मारली या यशा मागे श्री भैरवनाथ विद्यालय येथील प्राचार्य श्री शेख सादिक सर, क्रीडा शिक्षक श्री उदावंत सर मार्गदर्शन लाभले सुजित च्या या कामगिरीने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

सुजित च्या या कामगिरीमुळे लाल मातीच्या माध्यमातून पैलवान घडवणारे वस्ताद शकील भैय्या शेख व सुजित करगळ यांचे मुस्लिम पंच कमिटी जामखेड यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ घेण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम पंचकमिटी व पत्रकार उपस्थित होते आणि जामखेड तालुका पत्रकार संघ मंडळींनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here