Friday, February 13, 2026
Home राजकारण सामाजिक काम व युवकांच्या पाठबळावर प्रभाग क्रमांक सात मधुन महेश बाबासाहेब देशमाने...

सामाजिक काम व युवकांच्या पाठबळावर प्रभाग क्रमांक सात मधुन महेश बाबासाहेब देशमाने प्रबळ दावेदार

0
415

जामखेड न्युज—–

सामाजिक काम व युवकांच्या पाठबळावर प्रभाग क्रमांक सात मधुन महेश बाबासाहेब देशमाने प्रबळ दावेदार

जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमध्ये महेश बाबासाहेब देशमाने हे भारतीय जनता पक्षाकडून सर्वसाधारण जागेवरून प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत. सुशिक्षित तरुण युवकांचे मोठ्या प्रमाणावर पाठबळ, सामाजिक कार्यात अग्रेसर आणि कार्यक्षम चेहरा म्हणून महेश देशमाने हे प्रभाग सात साठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत.

सध्या प्रभागात एकच चर्चा आहे ती म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारे महेश बाबासाहेब देशमाने यांनी नगरपरिषदेची निवडणूक भाजपतर्फे लढवावी अशी मागणी होत आहे.

त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेतले असून सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यातही ते सक्रिय आहेत.श्री महेश देशमाने यांचे वडील श्री बाबासाहेब खंडू देशमाने हे चार वेळा ग्रामपंचायत सदस्य तसेच 2008 ते 2010 या कालावधीत जामखेड ग्रामपंचायतीचे सरपंच राहिले आहेत.

1990 पासून माझी खासदार लोखंडे साहेब व भाजप नेते आ.प्रा.राम शिंदे यांचे ते खंदे समर्थक असून, सध्या मारुती मंदिराचे ट्रस्टी म्हणून काम पाहत आहेत.या ठिकाणी सभामंडप उभारणीचा त्यांचा मानस असून, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी दुष्काळी काळात प्रभागात स्वखर्चातून पाणीपुरवठा केला आहे.

कोरोना काळात प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना व नागरिकांना मदत केली. श्री बाबासाहेब देशमाने हे आध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय असून, प्रभागातील नागरिकांच्या विकासासाठी नेहमी तत्पर आहेत.

कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनानुसार निष्ठेने काम करताना प्रभागातील रस्ते, लाईट, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा यांना प्राधान्य देणार असल्याचे महेश देशमाने यांनी सांगितले. त्यांच्या निष्ठावान कार्यपद्धतीमुळे आणि जनसंपर्कामुळे प्रभाग क्रमांक सातमध्ये महेश बाबासाहेब देशमाने हे प्रबळ दावेदार म्हणून उदयास येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!