सभापती प्रा राम शिंदे यांनी सचिन (नाना) घुमरे यांना केक भरवत केला वाढदिवस साजरा, सामाजिक कामाबद्दल कौतुकाची थाप वाढदिवसानिमित्त दिघोळ गणातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
सभापती प्रा राम शिंदे यांनी सचिन (नाना) घुमरे यांना केक भरवत केला वाढदिवस साजरा, सामाजिक कामाबद्दल कौतुकाची थाप
वाढदिवसानिमित्त दिघोळ गणातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व दिघोळ पंचायत समिती गणाचे इच्छुक उमेदवार सचिन (नाना) घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केक भरवत त्यांचा वाढदिवस साजरा केला. व शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच इतर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापती प्रा राम शिंदे यांनी सचिन घुमरे यांच्या सामाजिक कामाबद्दल कौतुकाची थाप दिली.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सचिन (नाना) घुमरे यांनी वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी जपत दिघोळ गणातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केले यामुळे संपूर्ण दिघोळ गणात सचिन घुमरे मय वातावरण निर्माण झाले आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. आपण समाजाचे देणे लागतो या दृष्टीकोनातून दिघोळ गणातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
सामाजिक कामाबद्दल सभापती प्रा राम शिंदे यांनी सचिन घुमरे यांच्या वर कौतुकाची थाप दिली.
“वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद म्हणजे समाजाचे देणे फेडणे,” या भावनेला साजेसा उपक्रम राबवत जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. सचिन (नाना) घुमरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा केला. या निमित्ताने माळेवाडी, दिघोळ, जातेगाव, मोहरी आणि जायभायवाडी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले होतेआज राहिलेल्या गावात वाटप केले तसेच निवारा बालगृहातील मुलांना खाऊ व बँगचे वाटप केले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण सचिन (नाना) घुमरे यांनी घालून दिले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, वि.का.से. सहकारी सोसायटीचे सदस्य, समस्त ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.