जामखेड न्युज—–
भाजपाचे एकनिष्ठ व सभापती प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रविण होळकर प्रभाग सातसाठी प्रबळ दावेदार
अहोरात्र जनसेवेमुळे जनतेतून उमेदवारी करण्याची मागणी
गेली १५ वर्षांपासून प्रसिद्धीपासून अलीप्त राहून कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवर निष्ठेने काम करताना प्रभागातील जनतेच्या नागरी समस्या जसे की, रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता यासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असणारे विविध शासकीय प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम प्रविण होळकर यांनी केले आहे.

भाजप पक्षाच्या बुथ प्रमुखापासून शक्ती केंद्रप्रमुख, जामखेड शहर उपाध्यक्ष, तालुका चिटणीस तसेच सध्या जामखेड शहर मंडळ उपाध्यक्ष पदावर काम करत असलेले पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व नामदार प्रा. राम शिंदे यांचे खंदे समर्थक प्रवीण राजेंद्र होळकर हे जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधुन उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत. त्यांनी उमेदवारी करावी यासाठी प्रभागातील जनता आग्रही असून सांभाळलेली पक्षनिष्ठा व सभापती प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून पक्षाची उमेदवारी नक्की मिळेल असा ठाम विश्वास प्रविण होळकर यांना वाटतो.
भारतीय जनता पार्टीचे जामखेड शहर मंडलचे उपाध्यक्ष असलेले प्रविण होळकर हे गेली १५ वर्षांपासून भाजपाच्या विविध पदांच्या तसेच गेली सतरा वर्षांपासून स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून सद्याचा प्रभाग क्रमांक सात व परिसरातील नागरिकांसाठी तन- मन-धनाने काम करत आहेत. त्यांनी गेली १७ वर्षांपासून भव्य स्वरूपात गणेश उत्सव साजरा करताना विविध कार्यक्रमांबरोबरच किर्तन महोत्सवाची अनोखी परंपरा सुरू केली. यामुळे गणेश उत्सवात गणेश भक्तांबरोबरच विठ्ठल भक्त वारकऱ्यांसाठी हा उत्सव आनंदाची पर्वणीच ठरत आहे.
प्रविण होळकर यांच्या सौभाग्यवती नंदाताई प्रवीण होळकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी स्वराज प्रतिष्ठान मार्फत सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन केले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमांना परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमत महिला भगिनींसाठी प्रभागातील सर्व वयोगटातील पुरुष व महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर, संगीत खुर्ची यासारखे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी महिलांबरोबरच पुरुष व लहान मुलांनीही मोठी उपस्थिती लावली तसेच दहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमासाठी प्रभागातील सर्व वयोगटातील पुरुष व महिला भगिनी व स्वराज प्रतिष्ठान च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.








