Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या शासनाला जाब विचारण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार आक्रोश मोर्चा – सुनील...

शासनाला जाब विचारण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार आक्रोश मोर्चा – सुनील साळवे

0
1434

जामखेड न्युज—–

शासनाला जाब विचारण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार आक्रोश मोर्चा – सुनील साळवे

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुबिंयावर झालेल्या भ्याड हल्ला त्याच्या निषेधार्थ सर्व रिपब्लिकन, आंबेडकरवादी पक्ष व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनवर भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने माताभगिनी व तरूण उपस्थित होते.

यावेळी बोलताना विवेक भाई म्हणाले की, सध्या फक्त सहाच आरोपी अटक आहेत बाकी हल्यातील सर्वच आरोपींना अटक करावी तर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, शासनाला जाब विचारण्यासाठी हा भव्य दिव्य एल्गार आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

१. गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करावी

२. गुन्ह्यातील आरोपींवर संघटीत गुन्हेगारी खाली (मोक्का अंतर्गत) गुन्हा दाखल करावा

३. साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे
४. साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट असल्याने कलम १२० ब लावावे व मुख्यसूत्रधारास अटक करावे.
५. केस फास्टट्रँक वर चालवावी व विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करून सहा महिन्याच्या आत निकाल द्यावा

यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आंबेडकरवादी जनता याचबरोबर विवेक भाई, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, प्रा. विकी घायतडक, संतोष गव्हाळे, विकास मासाळ, विशाल गव्हाळे, आतिष पारवे, सतिश साळवे, शिवाजी साळवे, युवराज गायकवाड, बापू जावळे, अनिल जावळे, सुरेखा सदाफुले यांच्या सह अनेक माताभगिनी व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांचे कुटुंबावर दि. २४/०८/२०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या जीवघेणा भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ दि. १२/१०/२०२५ रोजी जामखेड येथे एल्गार मोर्चा सकाळी ठिक ११.०० वाजता रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीने संविधान चौक ते पोलीस स्टेशन, जामखेड एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे.

संविधान चौकात मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी संविधान चौकात जमा झाले व भव्य दिव्य मोर्चा पोलिस स्टेशन वर धडकला यावेळी हल्यातील सर्वच आरोपींना अटक करण्याची मागणी अनेकांनी केली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!