Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या साकतमध्ये श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहास आजपासून सुरूवात वानराचा...

साकतमध्ये श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहास आजपासून सुरूवात वानराचा गावात आजच प्रवेश

0
770

जामखेड न्युज—–

साकतमध्ये श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताहास आजपासून सुरूवात

वानराचा गावात आजच प्रवेश

महान संत श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचे ४३ वर्षापूर्वी देहावसन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी वानर आले होते. अंत्यसंस्कार होईपर्यंत होते दुसऱ्या दिवशी हस्ती गोळा करण्यासाठी पण ते हजर होते. अशा या महान संताच्या पुण्यतिथी निमित्त साकत मध्ये हभप उत्तम महाराज वराट यांनी साकत मध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. आजपासून त्याची सुरुवात होत आहे. पुण्यतिथी सप्ताह निमित्त दरवर्षी वानर हजेरी लावते ही विशेष बाब आहे.

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज (आबा) हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. त्यांनी नैष्ठिक ब्रम्हचारी जीवन जगून अवीरथ भगवंत भक्ती केली. ब्रम्हचारी व्रताची पावती म्हणून अंत्यविधीला वानराच्या रूपाने हजर राहून स्वतः अस्ती बाजूला काढून रक्षा सावडली ते आजही नामसप्ताहमध्ये प्रत्यक्षात आठ दिवस वानर रूपाने हजेरी लावते. आज सुरू होणाऱ्या सप्ताह साठी कालच दोन वानराने हजेरी लावली आहे.

अशा सत्पुरुषाच्या हस्ते साकत येथे १ मे १९५५ साली अखंड वीणा व नंदादीप विठ्ठल मंदिरात सुरू केले ते आजपावेतो सुरू आहे. अशा पुण्यभूमीत श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज (आबा) यांचे ४३ वी पुण्यतिथी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताह साठी वानराने आजच गावात हजेरी लावली आहे आता आठ दिवस ते गावात राहणार आहे. सकाळी सप्ताह मंडपात वानराने हजेरी लावली. साकत पंचक्रोशीतील लोक वानराला आबाच्या रूपाने पाहतात व दर्शन घेतात.

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आज आश्विन वद्य २ बुधवार दि. ८ पासून सप्ताहाची सुरूवात होत आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

दैनिक कार्यक्रम
पहाटे ४ ते सहा काकडा भजन, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्रनाम, ८ ते १० श्रीमद् भगवद्गगीता पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते १ भोजन, ३ ते ५.३० नामजप, ५.३० ते ६.३० हरिपाठ, ७ ते ९ किर्तन, ९ ते १० सामुदायिक भोजन, १० ते ४ जागर

प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने
बुधवार दि. ८ रोजी हभप भजनसम्राट गुरुवर्य हनुमंत महाराज मते दहिफळकर, गुरूवार दि. ९ हभप जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर, शुक्रवार दि. १० रोजी हभप दत्ता महाराज आंबिरकर डिकसळ, शनिवार दि. ११ रोजी हभप कृष्णाजी महाराज येवले श्री क्षेत्र पैठणकर, रविवार दि. १२ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे (माऊली) (ज्ञानेश्वरी कंठस्थ) , आळंदी, सोमवार दि. १३ रोजी हभप चांगदेव महाराज काकडे ( गाथा कंठस्थ) परतूर, मंगळवार दि. १४ रोजी हभप न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे बीड
मंगळवार दि. १४ रोजी सकाळी सकाळी ८ ते १० दिंडी मिरवणूक व १२ ते २ हभप उत्तम महाराज वराट साकतकर यांचे गुलालाचे किर्तन होईल.
बुधवार दि. १५ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे किर्तन होईल

अशा प्रकारे अश्विन वद्य. २ बुधवार दि. ८ रोजी सुरूवात तर अश्विन वद्य. ९ बुधवार दि १५ रोजी
सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजक हभप उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४३ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वानर नित्यनेमाने हजेरी लावत आहे.

किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ, केशव अडसूळ, सार्थक लहाने आहेत

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे

भजन कीर्तन व्यवस्थापक श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने,महादेव सुतार, शंकर वराट, नवनाथ वराट, ज्ञानदेव वराट, बळीराम दळवी, कुंडलिक लहाने, महादेव लहाने, श्रीराम भालेराव, मोहन अडसूळ, विष्णू मुरूमकर, रोहिदास लहाने, गोकुळ वराट, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे

गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर राहतील. सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट असतील. तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!