रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व भौतिक समितीचे गठन
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत नुकताच नवीन अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शाळांना विद्यार्थी सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या लागणार असून, याच अनुषंगाने जामखेड येथिल रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व भौतिक समितीचे गठन करण्यात आले आहे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिते संदर्भात करावयाच्या उपयोजनाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत.
बदलापूर, ता.अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयान्वये माजी सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन शासनाने दिनांक 13 मे 2025 च्या शासन निर्णय तसेच संचालयाने दिनांक 21 मे 2025 व 25 जुन 2025 च्या पत्रान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षितेच्या अनुषंगाने करावयाच्या उपयोजना संदर्भात रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये समिती गठीत करण्यात आली.
विद्यालयाच्या कार्यालयामध्ये सर्व सदस्यांची एकत्रित सभा आयोजित केली समितीचे सदस्य शिक्षणतज्ञ शिवाजीराव ढाळे यांच्या अध्यक्षतेखाली व समितीचे सचिव प्राचार्य मडके बी.के., केंद्रप्रमुख राम निकम आर.एम., ढवळे डी.आर., ॲड. ऋषिकेश डूचे, डॉ. सचिन काकडे, सय्यद मुक्तार, अंगणवाडी सेविका पुष्पा भोसले, उद्योजक नितीन राळेभात, पालक सदस्य अविनाश बोधले, अनिता गीते, विशाल राऊत, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, साळुंखे बी. एस.विभाग प्रमुख संभाजी इंगळे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यालय व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, सुरेश भोसले प्रकाश सदाफुले वतीने सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
समितीच्या समोर काही विषयांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसामावेश सूचना निर्मितीत करण्यात आल्या. त्यामध्ये लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012 हा केंद्र शासनाचा कायदा व सदर कायद्याखालील नियमावली यांचे पालन करणे, शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार POCSO व CHIRAG या ॲपवर करणे व इतर उपयोजना, विद्यार्थी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि चिंता व्यक्त करण्यासाठी शाळेत तक्रार पेटी बसविणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना खबरदारी आणि त्यांच्या कामावर देखील ठेवणे, चारित्र्य पडताळणी करणे, शाळेत आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची उभारणी करणे, शाळेतील प्रसाधनग्रह, स्वच्छताग्रहाबाबत कार्यवाही करणे, विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने कारवाई करणे.
विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या विविध पैलू बद्दल प्रशिक्षण देणे, सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळा-पालक यांच्यामध्ये जनजागृती करणे, शाळांमध्ये सखी सावित्रीचे गठन करण्याबाबतची कारवाई करणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.