Wednesday, March 4, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यातील या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा ३७.३३ लाखांच्या मुद्देमालासह चाळीस जण...

जामखेड तालुक्यातील या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा ३७.३३ लाखांच्या मुद्देमालासह चाळीस जण ताब्यात

0
1924

जामखेड न्युज——-

जामखेड तालुक्यातील या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा ३७.३३ लाखांच्या मुद्देमालासह चाळीस जण ताब्यात

अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असून त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. समीर अभंग यांच्यासह पथकाने 11 सप्टेंबर रोजी खर्डा पोलीस ठाणे हद्दीत जातेगाव शिवारात जुगार खेळणाऱ्या इसमांवर छापा टाकला. यात 37.33 लाखांच्या मुद्देमालासह चाळीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईत लक्ष्मण प्रभु गायकवाड याच्यासह एकूण 40 जणांना अटक करण्यात आली. हे सर्वजण पत्त्यांवर पैसे लावून तिरट प्रकारचा जुगार खेळत असल्याचे आढळले. झडतीदरम्यान रोख रक्कम, पत्ते, मोबाईल फोन, वाहने यांसह एकूण ₹37,33,600 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे:
1) बाळासाहेब चांगदेव खाडे वय- 50 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड,
2) बाळासाहेब रामचंद्र नेटके वय-63 वर्षे रा. जामखेड ता.जामखेड,
3) संतोष विजयसिंग साळुंके वय- 45 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड,
4) राजेंद्र मुरलीधर आहेर वय-39 वर्षे रा. डोकेवाडी ता.भुम, जि.धाराशिव
5) रामचंद्र बापुराव राळेभात वय-70 वर्षे रा. जामखेड ता. जामखेड,
6) दादासाहेब पांडुरंग गायकवाड वय-60 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड जि. अहिल्यानगर
7) अजय बबन सकट वय-38 वर्षे रा. खर्डा, ता.जामखेड जि. अहिल्यानगर,
8) रविंद्र महादेव भुते वय- वय-36 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड
9) पवन बबन थोरात वय-37 वर्षे रा. इट ता.भुम जि.धाराशिव
10) दत्तात्रय मुरलीधर घाटे वय- 43 वर्षे रा. नागेवाडी ता. भुम जि. धारशिव


11) नितीन श्रीराम गिते वय-38 वर्षे रा. दिघोळ ता.जामखेड,
12) मारुती छना गिते वय-48 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड जि.अहिल्यानगर
13) बापु अनुरथ चव्हाण वय-40 वर्षे रा. पकरुड ता. भुम जि. धारशिव
14) सुनिल नरसिंग काळे वय-34 वर्षे रा. पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड,
15) विक्रम अरुण शिंदे वय-50 वर्षे रा.दिघोळ ता. जामखेड
16) दादासाहेब महादेव गायकवाड वय-44 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड
17) मधुकर नाथोबा बांगर वय – 60 वर्षे रा. बाहेळा ता.पाटोदा, जि.बीड
18) गणेश सुगरीब दौंड वय-39 वर्षे रा.दौंडाचीवाडी ता.जामखेड
19) पंडित किसन दाताळ वय-36 वर्षे रा. वाकी ता.जामखेड
20) चंद्रकांत नागुराव गावडे वय-50 वर्षे रा. पारगांव ता.वाशी, जि. धाराशीव

21) अहमद नुरखा पठाण वय-43 वर्षे रा.बोरखेड ता.जि.बीड,
22) पोपट उत्तम राजगुरु वय-37 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड,
23) संतोष दत्तात्रय राऊत वय-52 वर्षे रा. पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड,
24) संजय बबन भोसले वय-23 वर्षे रा.अमळनेर ता.पाटोदा जि.बीड,
25) भगवान चंद्रकांत गरड वय-34 वर्षे रा.कोष्टीगल्ली भुम ता.भुम जि.धाराशीव
26) गणेश शिवाजी शिंदे वय-48 वर्षे रा. वैद्यकीणी ता. पाटोदा जि.बीड,
27) दत्तात्रय जयसिंग खंडागळे वय-40 वर्षे रा. मात्रेवाडी ता.भुम जि.धाराशिव
28) धनजंय भगवान मोटे वय-40 वर्षे रा. गिरवली ता.भुम जि.धाराशिव,
29) बाजीराव भगवान जाधव वय-52 वर्षे रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड,


30) अशोक उत्तम भोरे वय-35 वर्षे रा.पारगांव ता.वाशी. जि.धाराशिव,
31) शंकर दिगंबर आवारे वय-40 वर्षे रा.माळेवाडी ता. जामखेड
32) धोंडीबा बाबा येळे वय-45 वर्षे रा. मोहरी ता. जामखेड
33) फैय्याज मेहबुब सय्यद वय – 49 वर्षे रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड,
34) लक्ष्मण प्रभु गायकवाड वय-45 वर्ष रा. जातेगांव ता. जामखेड,
35) पोपट नाना खरतोडे वय-60 वर्षे रा.बोडकेवाडी ता.पाटोदा, जि.बीड,
36) सुनिल आश्रुबा बोबडे वय – 45 वर्षे रा.इट.ता.भुम जि. धाराशिव
37) रावसाहेब उत्तम राजगुरु वय-35 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड,
38) किरण मुकुंद गोलेकर वय – 42 वर्षे रा. खर्डा ता. जामखेड,
39) अकलाक अहमद शेख वय-31 वर्षे रा. बार्शी नाका, ता. जि. बीड,
40) अशोक रावसाहेब गिते रा. दिघोळ ता. जामखेड असे असल्याचे सांगितले.

या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 147/2025, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोहीमेत खर्डा, शेवगाव आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या सर्व संयुक्त कारवायांतून एकूण ₹38,20,825 किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, शामसुंदर गुजर, मोहन साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, महादेव भांड, भाग्यश्री भिटे यांनी केली आहे.

सदर कारवाईमुळे खर्डा हद्दीतील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत,यापूढेही अशाच प्रकारची कारवाई करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!