Tuesday, March 3, 2026
Home ताज्या बातम्या प्राचार्य अप्पासाहेब शिरसाट यांना नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड

प्राचार्य अप्पासाहेब शिरसाट यांना नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड

0
966

जामखेड न्युज—–

प्राचार्य अप्पासाहेब शिरसाट यांना नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड

 

प्रदीप कुमार महादेव बांगर माध्यमिक व श्री देवीचंद वामनराव डोंगरे उच्च माध्यमिक विद्यालय मोहा चे प्राचार्य श्री अप्पासाहेब शिरसाट यांना वर्ल्ड एन्व्हायरमेंट कौन्सिल नवी दिल्ली या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2025 घोषित झाला आहे.

जागतिक स्तरावर पर्यावरणा शिक्षणाचे काम करणाऱ्या या संस्थेतर्फे दरवर्षी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात यावर्षीही भारतातील 11 शिक्षक व ट्युनिशिया या देशातील एक शिक्षक अशा एकूण बारा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे.

त्यामधील एक प्राचार्य अप्पासाहेब शिरसाठ हे आहेत आदरणीय शिरसाट हे गेल्या 25 वर्षापासून प्राचार्य म्हणून मोहा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शिक्षण, पर्यावरण व समाजकार्य याबद्दल कार्य करत असून त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये शिकणारी बालके त्याचप्रमाणे ऊसतोड कामगारांची मुले यांना आपल्या अध्यापनाने प्रभावित करून त्यांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवलेले आहे.

आजही या जामखेड तालुक्यातल्या ग्रामीण परिसरामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडचणी जसे बालविवाह, घरच्या जबाबदारीमुळे शाळा सुटणे, आई वडिलांना कामांमध्ये मदत करणे, इत्यादीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत पण आदरणीय सर आणि त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे त्या पालकाचं मार्गदर्शन आणि उद्बोधन करून त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नियमित येण्यास प्रवृत्त करतात.

आणि किमान बारावीपर्यंतची त्यांचा शिक्षण पूर्ण करतात. मोहा विद्यालयातर्फे आजही परिसरातून नाणेवाडी, पांडव वस्ती सारख्या दुर्गम ठिकाणातून दररोज पायी चालत येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बसची सुविधा संसथेच्या सहकार्याने उपलब्ध करून दिलेली आहे. आजच्या स्थितीत या विद्यालयाचे शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे क्रीडा क्षेत्रामध्ये दरवर्षी किमान एकतरि संघ जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरतो.


अभिमानाची बाब म्हणजे विद्यालयामध्ये मुलां पेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे अशा प्रकारच्या भरीव कार्याबद्दल आदरणीय शिरसाट सर यांना राष्ट्रीय स्तरावरून गौरविण्यात आले आहे त्याबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सन्माननीय संचालक मंडळ गावातील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी, पालक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!