मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य, जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी

0
678

जामखेड न्युज——

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य, जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी

 

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठा विजय मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकारने सकारात्मक पवित्रा घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या. तसेच हैदराबाद गॅझेट चा जीआर देखील काढण्यात आला. त्यामुळे जामखेड येथील खर्डा चौकात मराठा बांधवांनी जल्लोष करीत सरकारच्या निर्णयाचे फटाके फोडून स्वागत केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव हे मुंबईकडे दाखल होत होते.

अखेर या उपोषणाची व आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मंगळवार दि २ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आझाद मैदानावर गेलं होतं. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्य या शिष्टमंडळात आहेत.

या शिष्टमंडळाने सरकारचा तयार केलेला मसुदा मनोज जरांगे पाटील यांना दाखवला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना माहिती दिली. मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझिटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती. राज्य सरकराने ही मागणी मान्य केली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण देखील मागे घेण्यात आहे.

याच अनुषंगाने जामखेड शहरात देखील सरकारच्या निर्णयाचे स्वागत करुन मराठा बांधव हे खर्डा चौकात जमा झाले. यावेळी त्यांनी फटाके फोडून एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा घोषणा देण्यात आल्या. सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे उद्या मराठा बांधवांनी पुकारलेला जामखेड बंद देखील मागे घेण्यात आला असून उद्या सर्वांनी आपली दुकाने उघडी ठेवावीत आसे देखील सांगण्यात आले.

तसेच जोपर्यंत जरांगे पाटील मराठा समाज्यासाठी लढत रहातील तो पर्यंत आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहु असे देखील मराठा बांधवांनी सांगितले. यावेळी अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here