बीड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या चार खेळाडूंची राज्याच्या संघात निवड ओशन क्रिकेट अकॅडमीच्या दोन खेळाडूंचा समावेश, श्री साकेश्वर विद्यालयातील साई घोडेस्वार ची निवड
बीड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या चार खेळाडूंची राज्याच्या संघात निवड
ओशन क्रिकेट अकॅडमीच्या दोन खेळाडूंचा समावेश, श्री साकेश्वर विद्यालयातील साई घोडेस्वार ची निवड
अकलूज येथे झालेल्या सतरा वर्षाखालील टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तर स्पर्धेमध्ये बीड संघाचे प्रतिनिधित्व करताना स्पर्धेमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर बीड जिल्हा संघातील चार खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. यातील दोन खेळाडू ओशन क्रिकेट ॲकॅडमीचे दोन खेळाडू आहेत. साई घोडेस्वार हा श्री साकेश्वर विद्यालय साकत येथील खेळाडू आहे.
अकलूज येथे 17 वर्षे खालील मुलांची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये बीड संघाने सहभाग घेतला व आपल्या कामगिरीने वेगळीच छाप पाडली. या संघामधील साई घोडेस्वार यांने सात विकेट, कार्तिक कोठुळे आठ विकेट, हर्षल सानप सहा विकेट आणि सोफियान सय्यद यांनी जबरदस्त बॅटिंगचे प्रदर्शन करत आपली स्पर्धेमध्ये छाप उमठवली.
या स्पर्धेमध्ये ओशन क्रिकेट ॲकॅडमी पाटोदा येथील आठ प्लेयर ची जिल्हा क्रिकेट टीम मध्ये निवड झाली होती. यापैकी साई घोडेस्वारव कार्तिक कोठुळे यांनी दैदिप्यमान कामगिरी करत आपला ठसा उमटवला. यातील साई घोडेस्वार हासाकेश्वर विद्यालय साकत येथील विद्यार्थी आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश आण्णा धस, सचिव तथा प्रशिक्षक सुशील तांबे सर, उपाध्यक्ष अविशांत कुमकर , कोषाध्यक्ष चौरे सर यांनी केले. या खेळाडूंची सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चौकट गेल्या वर्षी श्री साकेश्वर विद्यालयातील खेळाडू शुभम घोडेस्वार याचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. तसेच ड्रीम लीग इंडिया च्या पोस्टर वर शुभमचा फोटो झळकलेला आहे. आणि याही वर्षी साई घोडेस्वार याचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी विद्यालयातील खेळाडूची निवड झाली आहे.