जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातून हजारो मराठा बांधव जाणार मुंबईला समाजबांधवांची जामखेड मध्ये बैठक संपन्न

0
727

जामखेड न्युज——-

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातून हजारो मराठा बांधव जाणार मुंबईला

समाजबांधवांची जामखेड मध्ये बैठक संपन्न

संघर्ष योद्धा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. जामखेड तालुक्यातील मराठा बांधव देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी मंबई याठिकाणी दाखल होणार आहेत. याच अनुषंगाने आज अखंड मराठा समाज, जामखेडच्या वतीने नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठीचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला असून पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी अखंड मराठा समाज जामखेडच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मंबई येथे जाण्यासाठीचे नियोजन तसेच विविध विषयांवर चर्चा झाली.

जामखेड तालुक्यातील सर्व गावा-गावात मराठा बांधवांनी घोंगडी बैठका आयोजित कराव्यात. तसेच मराठा बांधवांना मोर्चा संबधित माहिती कळावी यासाठी शहरासह तालुक्यात जनजागृती करण्यासाठी स्पिकर लाऊन वहाने फिरविण्यात येणार आहेत.प्रत्येक गावात डीजीटल बोर्ड लावुन जनजागृती करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटिल हे मंबईकडे रवाना होण्यासाठी दि २७ रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. दुपारी ते अहिल्यानगर याठिकाणी येणार असुन त्यांच्या ताफ्यात जामखेड येथुन आलेली वाहने सामिल होणार आहेत.

आजची बैठक जरी संपन्न झाली असली तरी पुन्हा रविवार दि २४ रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा बीड कॉर्नर, जामखेड याठिकाणी मागील कामांचा आढावा व पुढील मोर्चाचे नियोजन कसे करायचे यासाठी पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीस जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित रहाण्याचे अवाहन अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट

मनोज जरांगे पाटील २७ ऑगस्ट रोजी अंतरवली-सराटी येथून संघर्ष यात्रेला प्रारंभ करणार आहेत. अहिल्यानगर मार्गे येताना त्यांचा पहिला मुक्काम किल्ले शिवनेरी येथे राहील. त्यानंतर जुन्नर, चाकण, तळेगाव, खोपोली, पनवेलमार्गे ते २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी नवी मुंबईत दाखल होतील. या प्रवासात हजारो आंदोलनकर्ते सहभागी होणार आहेत. जामखेड तालुक्यातुन देखील मंबईकडे हजारो मराठा बांधव रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here