जामखेड न्युज – – – –
टोकियो ऑलिम्पिकमध्ये निरज कुमारने सुवर्ण पदक जिंकल्यावर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, “छोरे ने कमाल कर दिया.. अपेक्षेनुसार नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळालं आहे. त्यांना आता ठरल्यानुसार ६ कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. हरयाणामध्ये सेंट्रल फॉर एक्सलन्स अकादमी बनवली जाईल. त्याचं हेड नीरज चोप्राला केलं जाईल.” अशा अनेक घोषणा सह कौतुकाच
वर्षांव निरजवर होत आहे
ऐतिहासिक टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. दरम्यान, संंपुर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजसाठी मोठी घोषणा केली आहे.
शेवटी सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!
भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३. मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नाही तर हे अॅथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे.
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.










