जामखेड पोलीसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम, डोणगाव येथील हातभट्टी दारूचा अड्डा नष्ट

0
325

जामखेड न्युज—–

जामखेड पोलीसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम, डोणगाव येथील हातभट्टी दारूचा अड्डा नष्ट

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेड चा पदभार स्विकारताच अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या निर्णयाचे सर्व सामान्य जनतेकडून कौतुक होत आहे.

जामखेड तालुक्यातील डोणगाव याठिकाणी जामखेड पोलीसांनी गावठी हातभट्टी व दारुचे कच्चे रसायन करण्याचे सामान नष्ट केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. यामुळे डोणगाव परीसरातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पोलीसांनकडुन मिळालेली माहिती अशी की दि ३ ऑगस्ट रोजी जामखेड तालुक्यातील डोणगाव परीसरात अवैद्य हातभट्टी तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनच्या पथकाला घटनास्थळी पाठवले. यावेळी त्यांनी आरोपी कौसाबाई चंद्रकांत पवार ही तीच्या घरासमोर वेड्या बाभळीच्या झाडाखाली गावठी हातभट्टी तयार करीत असल्याचे दिसुन आले.

यानंतर जामखेड पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम, पोलीस अंमलदार सचिन देवडे, प्रकाश जाधव, अमोल आजबे, महीला पोलीस कॉन्स्टेबल छाया क्षिरसागर, यांच्या पथकाने छापा टाकून पंधराशे रुपये किमतीची तीनशे लीटर हातभट्टी दारु व हातभट्टी बनवायचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.

यानंतर वरील महीला आरोपी विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here