जामखेडच्या मल्लाची जागतिक पातळीवर निवड ग्रीक देशात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पै.सुजय तनपुरे ची निवड

0
472

जामखेड न्युज———

जामखेडच्या मल्लाची जागतिक पातळीवर निवड

ग्रीक देशात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पै.सुजय तनपुरे ची निवड

 

     अहिल्यानगर जिल्ह्यातील शिऊर, तालुका जामखेड येथील पै.सुजय नागनाथ तनपुरे, कुस्ती खेळाडूने व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई बीच कुस्ती स्पर्धेत ७० किलो वजन गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

तसेच लखनऊ येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. या यशामुळे सुजयची ग्रीक देशात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.

   पैलवान श्री सुजल तनपुरे याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

पै. सुजय तनपुरे याने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके पटकावले आहेत. आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्या बद्दल जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पै. सुजय तनपुरे याने खेलो इंडिया यूथ गेम पटणा बिहार २०२५ मध्ये  ७१ किलो फ्रीस्टाईल गटात सुवर्ण पटकावले होते.

2023 मध्ये आशियाई कुस्ती 68 kg वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले होते. खेलो इंडिया गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. वडील संजय तनपुरे, हे देखील कुस्तीमध्ये सक्रिय आहेत. सुजयने आशियाई कुस्ती स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे.

सुजय तनपुरे, जामखेड तालुक्यातील शिऊर गावचा आहे. 2018-19 मध्ये तो सरावासाठी पुण्यात गेला, कारण त्याच्या गावी पुरेसे भागीदार नव्हते. 15 मे 2025  रोजी पाटणा येथे झालेल्या खेलो इंडिया गेम्समध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. सुजयने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here