भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने श्री संत वामनभाऊ पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार सभापती प्रा. राम शिंदे यांची खास उपस्थिती
भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने श्री संत वामनभाऊ पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार
सभापती प्रा. राम शिंदे यांची खास उपस्थिती
पंढरीची वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांसाठी भक्तीचा सण आहे. वारीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखीत संतांच्या पादुका पंढरपुरातील विठ्ठलाच्या भेटीसाठी नेल्या जातात.
आता सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळे भरून पाहण्यासाठी संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जाताना आज जामखेड शहरात आगमन झाले. यावेळी लक्ष्मी चौकात भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांची खास उपस्थिती होती.
श्री गहिनीनाथ गडावरून प्रस्थान प्रसंगी लाखो वारकरी टाळ अन् मृदंग गजरात संत वामनभाऊ महाराज यांचा जयघोष करीत महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा पंढरपूर कडे मार्गक्रमण करत आहे.
आज जामखेड शहरात आगमन झाले यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, कृषी उत्पन्न बाजारचे सभापती शरद कार्ले, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, रवी सुरवसेशहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, डॉ. गणेश जगताप, राहुल बेदमुथ्था, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. संजय भोरे, मोहन पवार, अँड. प्रविण सानप, प्रविण चोरडिया, मोहन गडदे, आण्णासाहेब ढवळे, मनोज कुलकर्णी, डॉ. विठ्ठल राळेभात, विक्रांत घायतडक, महारुद्र महारनवर, तात्याराम पोकळे, उद्धव हुलगंडे, दिगंबर चव्हाण, सुरज काळे, किरण ओझर्डे, राहुल चोरगे यांच्या सह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला 125 वर्षांची परंपरा लाभलेली आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हणून या पालखीकडे पाहिले जाते, या पालखी सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात इतर कोणतीच दिंडी सहभागी होत नाही. एकमेव एकच दिंडी गहिनीनाथ गडाची असते. या पालखी सोहळ्यात जवळपास दीड लाख वारकरी सहभागी होतात.