वारकऱ्यांच्या सेवा सुविधांचा सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा खर्ड्यात एकनाथ महाराजांच्या पादूकांचे घेतले दर्शन, वारकऱ्यांना सभापती प्रा. शिंदे यांच्या हस्ते रेनकोट चे वाटप
वारकऱ्यांच्या सेवा सुविधांचा सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा
खर्ड्यात एकनाथ महाराजांच्या पादूकांचे घेतले दर्शन,
वारकऱ्यांना सभापती प्रा. शिंदे यांच्या हस्ते रेनकोट चे वाटप
राज्यभरातील अनेक दिंड्या पंढरपूर ला चाललेल्या आहेत. सरकारने वारकऱ्यांसाठी काही सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या वारकऱ्यांना मिळतात की, नाही याचा आढावा विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला व खर्ड्यात एकनाथ महाराजांच्या पादूकांचे घेतले दर्शन घेत वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले.
सालाबाद प्रमाणे श्री संत एकनाथ महाराज यांची पैठण येथून पालखी पंढरपूरकडे जात असताना खर्डा शहरात गुरुवारी दिनांक 23 जून रोजी राम हवेली मध्ये मुक्कामी आली होती.
संध्याकाळी आरती व प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखीचे दर्शन घेण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी खर्डामध्ये येऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीच्या पादुकांचे दर्शन घेतले व पालखी प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी यांचा त्यांनी सत्कार केला.
वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिलेल्या सेवेचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आलेल्या दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राम हवेलीच्या वतीने संतोष रासने, आसाराम लद्दड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जामखेड तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व खर्डा ग्रामस्थ वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.