जामखेडमध्ये पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची आदर्श नियमावली
हॉटेल, कलाकेंद्र, वाहनचालकांसाठी काय आहे नियमावली
जामखेडचे पोलीस निरीक्षक म्हणून दशरथ चौधरी यांनी पंधरा दिवसांपुर्वी चार्ज घेतला. पहिले आठ दिवस अभ्यास केला आणि नंतर परिसरातील गुन्हेगारी अवैध धंदे, नियमबाह्य वाहतूक, रोड रोमिओ यांच्या विरोधात कडक अँक्शन घेत कारवाईला सुरूवात केली. हॉटेल, कलाकेंद्र, पानटपऱ्या कती वाजेपर्यंत उघड्या राहतील यासाठी तसेच वाहनचालकांसाठी एक आदर्श नियमावली लागू केली या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
रात्री अकरा वाजता हाॅटेल पानटपरी बंद जामखेड शहरातील अनेक हाॅटेल व पानटपऱ्या रात्री बराच वेळ चालू असावयाच्या यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावले होते. यावर नियंत्रणासाठी हाॅटेल चालकांना सक्त नियमावली लागू केली आहे. रात्री अकरा ला बंद म्हणजे बंदयामुळे काही प्रमाणात गुन्हेगारी ला आळा बसणार आहे.
कलाकेंद्र रात्री एक वाजता बंद जामखेड परिसरात नऊ कलाकेंद्र आहेत. रात्री कलाकेंद्रात मोठ्या प्रमाणावर हौसे, नवसे, गवसे येतात आणि रात्री एक नंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय तसेच वेगळाच नंगानाच सुरू असायचा यावर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आळा घातला आहे. रात्री एक वाजता बंद म्हणजे बंद हा नियम आणलेला आहे. अनेक पर जिल्ह्यातील गुन्हेगार कलाकेंद्रा च्या आश्रयास येत होते. यावर चाप लावला आहे.
वाहतुकीसाठी शिस्त
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळ्या काचा तसेच फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट (मोटार सायकल) तसेच कर्णकर्कश आवाज करणारे तसेच विना लायसन्स वाहने चालवणे आता महागात पडणार आहे कारण या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. कर्णकर्कश आवाज असणाऱ्या तसेच काळ्या काचा गाड्या वर जामखेड पोलीसांनी धडक मोहीम राबवत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला आहे. यामुळे नियमबाह्य वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेड चा नुकताच पदभार घेतला असून परिसरातील हाॅटेल चालकांसाठी एक नियमावली केली आहे रात्री अकरा वाजता सर्व हाॅटेल बंद केले जातात तसेच कलाकेंद्र एक वाजता बंद केले जातात, अवैध दारू विक्री व अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
तसेच शाळा काॅलेज परिसरात मोकाट फिरणारे तसेच रोड रोमिओ यांच्या वर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यांचा लवकरच बंदोबस्त करू याचबरोबर रस्त्यावर गाड्या लावणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, गाड्या रेस करणे, ट्रिपल सीट गाड्या चालवणे या नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.
जामखेड न्युजशी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक आदर्श नियमावली बनवली असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. वाहनचालकांनी नियमाचे पालन करावे, ट्रिपल सीट गाड्या चालवू नयेत, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा गाड्या उभ्या करू नयेत तसेच काळ्या काचा विरोधातील मोहीम सगळीकडे राबवली जाणार असून, नागरिकांनी स्वतःहून काळ्या फिल्म काढण्याचे आवाहन केले आहे. काळ्या काचांचा वापर मोटर वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि यामुळे दंडासह वाहन जप्तीचाही धोका आहे. ही मोहीम काही दिवसांपुरती मर्यादित नसेल, तर जोपर्यंत काळ्या काचांचा वापर पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत ती सुरू राहील. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि स्वतःच्या वाहनांवरील काळ्या फिल्म तातडीने काढाव्यात असे सांगितले.