वेषांतर करून पीक अप वाहनातून प्रवास करत जिल्ह्यातील वाळू तस्करांवर मोठी कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे विश्वास नांगरे पाटील व सुनील रामानंद यांच्या कार्याची आठवण
वेषांतर करून पीक अप वाहनातून प्रवास करत जिल्ह्यातील वाळू तस्करांवर मोठी कारवाई
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे विश्वास नांगरे पाटील व सुनील रामानंद यांच्या कार्याची आठवण
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. दररोज कुठे ना कुठे कारवाई करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वेषांतर करून पीक अप वाहनातून प्रवास करत वाळू तस्करांवर मोठी कारवाई केली आहे या धडाकेबाज कामगिरीमुळे जिल्ह्याला तत्कालीन पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील व सुनील रामानंद यांच्या कार्याची आठवण झाली आहे. या सिंघल अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) येथे प्रवरा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत २८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ४ आरोपी फरार आहेत. तसेच गावठी हातभट्टीची विक्री करणाऱ्या एका महिलेवरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर) यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. २३ जून २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे चिंचोली परिसरात छापा टाकण्यात आला. त्यावेळी अवैध वाळू उपसा करत ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे वाळू वाहतूक करणारे काही इसम आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी वाहनांसह पळून गेले. मात्र, पथकाने पाठलाग करून ३ आरोपींना ताब्यात घेतले.
कारवाईत एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू भरलेला ट्रॅक्टर, टाटा डंपर, हायवा, जेसीबी तसेच १८ ब्रास वाळू असा एकूण २८ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत, एकलव्य वसाहत राहुरी येथे एका महिला तिच्या राहत्या घरात गावठी हातभट्टीची दारू साठवून विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने छापा टाकून दारू जप्त केली असून सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे व वैभव कलुबमें, आणि डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकातील पोसई राजेंद्र वाघ, सफौ शकील शेख, पोहेकों शंकर चौधरी, पोहेकाँ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ अजय साठे, पोहेकाँ दिगंबर कारखिले, पोहेकाँ मल्लिकार्जुन बनकर पोहेकाँ दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोकाँ सुनिल दिघे, पोकाँ अमोल कांबळे, पोकाँ जालिंदर दहिफळे यांनी केली आहे.