Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रा समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मंगेश आजबे जिजाऊ...

जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रा समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मंगेश आजबे जिजाऊ रथयात्रेचे जामखेड शहरात शंभूराजे कुस्ती संकुल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत

0
590

जामखेड न्युज—–

जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रा समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मंगेश आजबे

जिजाऊ रथयात्रेचे जामखेड शहरात शंभूराजे कुस्ती संकुल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत

 

राजमाता जिजाऊ रथयात्रा समाजाला प्रेरणा देणारी आणि नव्या पिढीला इतिहासाची जाण करून देणारी ठरेल असा विश्वास वाटतो असे मत मंगेश आजबे यांनी व्यक्त केले.

आज सकाळी अकरा वाजता जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात शंभूराजे कुस्ती संकुलाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले ढोली बाजा व फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच जय जिजाऊ जय शिवराय घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शंभूराजे कुस्ती संकुलचे मंगेश आजबे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, शहाजी राळेभात, बापुसाहेब कार्ले, निखील घायतडक, तुषार गोलेकर, अँड हर्षल डोके, हरीभाऊ बेलेकर, हरिभाऊ आजबे, पांडुरंग माने, राजू गोरे, उमर कुरेशी, प्रकाश काळे, कुंडल राळेभात, गणेश हागवणे, अँड. ऋषिकेश डुचे, पै. बापू जरे, पै. चिराग आजबे यांच्या सह शंभूराजे कुस्ती संकुलचे पैलवान व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ३५१ व्या पुण्यतिथीनिमित्त जिजाऊंचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा ते समाधीस्थळ पाचाड (किल्ले रायगड) येथे यदुकुलभूषण राजे लखुजीराव जाधवराव तसेच परिसरातील लखुजीराजेंच्या वंशजांच्यावतीने जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळी पुण्यतिथीच्या दिवशी सिंदखेडराजा येथील पाच विहिरींच्या जलाने जिजाऊंच्या समाधीस जलाभिषेक करण्यात येणार असून दिनांक १४ जून रोजी सकाळी ८.३०वाजता मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून रथयात्रेचे प्रस्थान झाले आज जामखेड येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. दिनांक १४ जून ते १७ जून असे चार दिवसीय स्मृतिज्योत रथयात्रेचे नियोजन आहे.

सकाळी 11 वाजता सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ,जामखेड यांच्या वतीने बीड रोड कॉर्नर या ठिकाणी जिजाऊ स्मृती ज्योत रथयात्रेचे पूजन करण्यात आले यानंतर शंभूराजे कुस्ती संकुल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगेश आजबे यांच्या कार्यालयासमोर भव्य दिव्य स्वागत करण्यात आले तेथून शोभायात्रेस प्रारंभ होऊन,बस स्टॅंड येथे सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!