छावा चित्रपटासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली ही मागणी
गेल्या आठवड्यात सर्वत प्रदर्शित झालेला, विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा हा सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून यामध्ये विकी कौशल याच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमासाठी विकी कौशलने प्रचंड मेहनत घेतली. तलवारबाजी, घोडेस्वारी, शिकत अथक महेनत करत त्याने या चित्रटासाठी तयारी केली.
14 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कौतुक होत असून विकी कौशल याने साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात वसली आहे.
या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या 5 दिवसात या चित्रपटाने भरपूर गल्ला जमवला आहे. जवळपास 130 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या ‘छावा‘ सिनेमाने देशात 165.00 कोटींची कमाई केली आहे.
छावा चित्रपट टॅक्स फ्री करा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
याच दरम्यान मराठा आदोंलक मनोज जरांगे पाटील हे ‘छावा’साठी मैदानात उतरले आहे. ‘छावा’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती असून धाराशिव जिल्ह्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
धाराशिव मधील कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत. भगवा ध्वज फडकावत शिवजयंती उत्सवाची जरांगे पाटील यांनी सुरुवात केली. याचवेळी त्यांनी ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करावा ही मागणी केली.
तसेच राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. राहुल सोलापूरकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर सरकारच्या आदेशनानंतरच सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसेच द्वेषाने भरलेली टोळी असल्याची टीकाही जरांगे यांनी केली.
जगभरात ‘छावा’चं कलेक्शन किती ?
जगभरातील ‘छावा’ सिनेमाच्या कलेक्शन बद्दल बोलायचं या सिनेमाने जगभरात एकूण 230 कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे. चौथ्या दिवसाअखेरीस हे आकडे 195.60 कोटींच्या आसपास होते, असे समजते. येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.