जामखेड न्युज——
-
वाल्याला फाशी झालीच पाहिजे, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थ देखील दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले असून आरोपींना फाशी द्या अशी घोषणाबाजी करत आहेत. संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. घटनास्थळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आले आहेत.
मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. धनंजय देशमुख हे देखील पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. आंदोलनावेळी धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर ३ जण चढले आहेत. तर गावातील इतर तरुण हे दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढले आहेत. धनंजय देशमुख त्यांचे साडू दादा खिंडकर आणि अन्य काही नातेवाईक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी धनंजय देशमुख यांना भोवळ आली.









