जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
तालुक्यातील अरणगाव येथील शेतकर्यांच्या शेतातील विहीरीतील दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरी झाल्याची तक्रार शेतकरी मोहन रामदास कारंडे यांनी जून महिन्यात जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली होती. अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांची शोध मोहीम सुरू होती.
जून महिन्यात आरणगाव गावातील शेतकरी नाव मोहन रामदास कारंडे याचे मालकीच्या गट नंबर 81 मधील विहिरीतील 2 इलेक्ट्रिक मोटार चोरी गेलेल्या होत्या त्यावरून फिर्यादी नामें मोहन रामदास कारंडे यांचे फिर्यादी वरून जामखेड पो स्टे गु र न.286/2021 भा द वि कलम 379 प्रमाणे दिनांक 21/6/2021 रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर मोटार चोरी बाबत जामखेड पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदर मोटारी या आरणगाव गावातीलच अमोल नाना निगुडे याने चोरल्या आहेत.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना नमूद बातमीतील ठिकाणी रवाना करून अमोल नाना निगुडे याला आरणगाव गावातच ताब्यात घेऊन त्याला पाणी उपसा करणाऱ्या मोटार बाबत विचारपूस केली असता त्याने 2 इलेक्ट्रिक मोटारी काढून दिल्या आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, संदीप राऊत, अरुण पवार, विजय कोळी यांनी केली आहे.
पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली पोलिस नाईक सय्यद हे करीत आहेत.