मोहा परिसरात बिबट्याचे दर्शन, चारचाकी गाडीतून बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण
आठ दिवसांपूर्वी साकत घाटात बिबट्या चार चाकी गाडीला आडवा गेला होता. तसेच परिसरातील काही गावात बिबट्या दिसला अशा बातम्या येत होत्या रात्री सौताडा घाटात सतिश शिंदे किशोर सांगळे आणि संदिप डोंगरे यांनी बिबट्या पाहिला व व्हिडिओ चित्रिकरण केले. बिबट्या डोंगर परिसरात आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
एका चारचाकी गाडीला बिबट्या दिसला म्हणून सतिश शिंदे किशोर सांगळे आणि संदिप डोंगरे यांनी चारचाकी गाडी घेऊन सौताडा घाटात देवीच्या मंदिर परिसरात गेले असता एका मृत गायीचे मांस बिबट्या खात असताना दिसला त्यांनी चारचाकी गाडीतून बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले.
सौताडा, भुतवडा, तसेच डोंगर पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. कधी वन्य प्राण्यांवर उपजीविका करतात पण वन्य प्राणी मिळाले नाहीत तर जंगलाच्या बाजूला चरत असलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी जामखेड तालुक्यातील जातेगाव, नायगाव, धामणगाव, मोहरी, दिघोळ परिसरात बिबट्या असल्याच्या बातम्या येत होत्या वनविभागाने अनेक वेळा पिंजरा लावूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. तसेच धामणगाव येथे एक बिबट्या मृत अवस्थेत सापडला होता. तर महिन्यांपूर्वी आरणगाव येथे एका विहिरीत बिबट्या सापडला होता.
चौकट
नागरिकांनी अंधारात एकटे फिरू नये, बॅटरी बरोबर ठेवावी, मोबाईल वर गाणे लावावीत, शेळ्या, मेंढ्या, वासरे कुंपणाच्या आत ठेवावेत हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी.