जामखेड शहरासह तालुक्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन महामानवांचा आदर्श घ्यावा सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले

0
121

जामखेड न्युज——

जामखेड शहरासह तालुक्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध ठिकाणी अभिवादन

महामानवांचा आदर्श घ्यावा सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त जामखेड शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
तालुक्याचे प्रमुख शासकीय कार्यालय असणारे तहसिल कार्यालय येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास तहसिलदार गणेश माळी,पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
समस्त भिमसैनिक जामखेड तालुका संघटनेच्या वतीने 6 डिसेंबर 2019 रोजी तहसिल कार्यालयात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र बसवले होते त्यामुळे दरवर्षी तहसिल कार्यालयात येऊन महामानवास अभिवादन करणे हे आम्हा भिमसैनिकांचे आद्य कर्तव्य आहे. महामानवांचा आदर्श घ्यावा असे मत सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सामुदायिक बुध्दवंदना घेण्यात आली तहसिलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी अभिवादनपर आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, दादासाहेब घायतडक, रवि सोनवणे, सचिन सदाफुले, किशोर काबंळे, सुर्यकांत सदाफुले, योगेश अब्दुले, रवि सदाफुले, लखन मोरे, सनी प्रिन्स सदाफुले, प्रतिक सदाफुले व भारतीय बौद्ध महासभेचे सुरेखा सदाफुले, अरुणा सदाफुले, वसतिगृहाचे अधिक्षक काबंळे मॅडम सह आदी भिमसैनिक व तहसिल कार्यालयातील स्टाफ उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here