Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताह साकतमध्ये ह.भ.प.उत्तम महाराज वराट यांचे...

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताह साकतमध्ये ह.भ.प.उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन व पुष्पवृष्टी संपन्न

0
600

 

जामखेड न्युज——

श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी सप्ताह साकतमध्ये ह.भ.प.उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन व पुष्पवृष्टी संपन्न

 

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात आश्विन वद्य १ शुक्रवार दिनांक 18 पासून सुरूवात झाली आहे. तर सांगता आश्विन वद्य ९ शुक्रवार २५ रोजी सांगता आहे आज ह. भ. प. उत्तम महराज वराट यांचे गुलालाचे किर्तन मोठ्या गर्दीत संपन्न झाले. 

त्यांनी किर्तन सेवेसाठी पुढील अभंग घेतला होता

झुंजार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥
गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
ऊर्ध्वपुंड्र भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥२॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥

अर्थ

या जगामध्ये एक विष्णुदास असे एक योद्धे आहेत की ते या भवसिंधु रूप शत्रूशी युद्ध करू शकतात. त्यांना पाप-पुण्याची बाधा कधीही होत नाही. ते गोविंदाचे सारखे चिंतन करत असतात नेहमी करत असतात बसताना झोपल्यावर ते सारखे गोविंदाचे चिंतन करतात त्यामुळेच त्यांचे मनही गोविंद मय झालेले आहे. त्याच्या कपाळी ऊर्ध्वपुंड्र व कंठामध्ये तुळशीचे माळ असते त्यामुळे त्यांच्या कडे काळ देखील पाहण्यास थरथर कापतो .तुकाराम महाराज म्हणतात ज्या विष्णुदासांच्या अंगावर शंख चक्र इत्यादी मुद्रांचे शृंगार आहेत आणि ज्या लोकांमध्ये सतत नामामृत आहे ते वैष्णव केव्हाही कधीही कळीकाळाला भीत नाहीत.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, भरत लहाने, सुनिल वराट, अजित वराट, अर्जुन रासकर, सचिन वराट, महादेव मुरूमकर, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्या सह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४२ व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या आश्विन वद्य ९ शुक्रवार २५ रोजी सांगता
ह. भ. प. उत्तम महराज वराट यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

किर्तन सेवेसाठी नामवंत महाराज, वादक, गायक
उपस्थित

किर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हभप पंडित केशव महाराज जगदाळे, जालिंदर बप्पा येडशीकर, भरत पठाडे, आसाराम महाराज साबळे, बाजीराव महाराज वराट, मदन महाराज टिपरे, उत्तरेश्वर महाराज टिपरे, बाळू सुरवसे, मच्छिंद्र वाळेकर, हरिदास आबा गुंड, दिपक अडसूळ आहेत.

 

गायनाचार्य – हभप बिभीषण महाराज कोकाटे, हरीभाऊ महाराज काळे, कृष्णा महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, भरत महाराज साठे, नामदेव चव्हाण, अशोक सपकाळ, दिनकर मुरूमकर, भास्कर फुंदे, केशव घोलप, विष्णू म्हेत्रे, दादा आजबे, भाऊसाहेब कोल्हे, पंढरीनाथ राजगुरू, भरत घोलप, आण्णा घुमरे, गहिनीनाथ सकुंडे, प्रकाश महारनवर, नाना महारनवर, जालिंदर महारनवर, कल्याण राऊत, दत्ता घुमरे सह परिसरातील सर्व भजनी मंडळे,
भजन कीर्तन व्यवस्थापक श्रीकांत वराट, पांडुरंग अडसूळ, रामकिसन लहाने, दिपक अडसूळ यांच्या सह परिसरातील भजनी मंडळे गावातील भजनी मंडळ व नर्मदेश्वर वारकरी गुरूकुलातील सर्व विद्यार्थी सात दिवस हजर राहतील.

सप्ताहाचे संयोजक म्हणून हभप विवेकानंद भारती महाराज उर्फ उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य बाजीराव महाराज वराट व उत्तरेश्वर महाराज वराट फोटोग्राफर ओम दळवी असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!