जामखेड न्युज——
आरोपींना अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार
आण्णा सावंत व विठ्ठल सावंत यांच्या अटकेची मागणी
आण्णा सावंतच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला पंचवीस जून 2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामखेड कोर्टाने अगोदरच जामीन फेटाळला होता नुकताच श्रीगोंदा सेशन कोर्टाने फेटाळला आहे. मात्र आरोपी मोकाट फिरतात मात्र पोलीसांना दिसत नाहीत. आरोपींकडून जीवीताला धोका असल्याचे निवेदन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. तसेच जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सौरभ कदम यांनी निवेदनात दिला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आण्णा सावंत विरोधात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगोदरही जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असे म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत याच्या सह दोघा जणांनी नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आण्णा सावंत सह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी यांनी म्हटले आहे की, आण्णा आदिनाथ सावंत व विट्ठल ज्ञानेश्वर सावंत यांना अटक झालेली नाही सदर आरोपी जामखेड शहरात मोकाट फ़िरत आहेत या आरोपी कडून मला व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे व आरोपी मला वारंवार धमकी देतात तरी जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक करावी असे निवेदन देण्यात आले आहे.
आण्णा सावंत विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला
420,506,504 ,34 फसवणुकीचा गुन्हा 25-06-2024 रोजी दाखल झालेला आहे. गुन्हा रजिस्टर् नंबर् 326 जामखेड पोलिस स्टेशन. आरोपींचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा सेशन् कोर्टाने फेटाळला आहे.परंतु आरोपी आण्णा आदिनाथ सावंत व विट्ठल ज्ञानेश्वर सावंत यांना अटक झालेली नाही सदर आरोपी जामखेड शहरात मोकाट फिरत आहेत.
या आरोपी कडून मला व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे.आरोपी मला वारंवार धमकी देतात तरी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आरोपींना अटक करण्यासाठी आदेश देण्यात यावेत.
आरोपींना अटक न केल्यास मी सहकुटुब 23-09-2024 रोजी जिल्हाअधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार आहे असे निवेदनात फिर्यादी सौरभ कदम यांनी म्हटले आहे.
आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावे तसेच आम्हाला आमचे 5 लाख परत मिळावेत. 22 सप्टेंबर 2024 पर्यंत आरोपींना अटक न केल्यास 23 सप्टेंबर 2024 पासून जिल्हाअधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करणार आहे.
असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे
निवेदनाच्या प्रती
1) मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब गुहमंत्री महाराष्ट्र राज्य
2). पोलीस महासंचालक साहेब मुंबई
3) पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक विभाग
4). मा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर
5) मा. पोलीस विभागीय अधिकारी साहेब कर्जत विभाग
यांना देण्यात आल्या आहेत.