शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
599

जामखेड न्युज——

शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी १६ सप्टेंबर, २०२४ पर्यंत https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

वसतीगृहातील प्रवेशाची पहिली निवड यादी २० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून या निवड यादीनुसार २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार ३० सप्टेंबरपर्यंत निवड करण्यात येणार आहे.

दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना ५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here