Saturday, March 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड येथील घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास दोन वर्षांत एकाच घरात...

जामखेड येथील घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास दोन वर्षांत एकाच घरात चार वेळा चोरी

0
1458

जामखेड न्युज——

जामखेड येथील घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

दोन वर्षांत एकाच घरात चार वेळा चोरी

 

जामखेड शहरातील करमाळा रोडवरील उंदावंत यांच्या घरात रात्री घरफोडीत 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांत चार वेळा याच घरात चोरी झालेली आहे. कोणत्याही चोरीचा तपास लागलेला नाही.


आशा किसन उदावंत वय 42 वर्ष धंदा – नोकरी (शिक्षिका) रा. सोनेगाव ता. जामखेड जि. अहमदनगर मुळ रा. करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जामखेड शहरातील करमाळा रोडवरील गुगळे नर्सरी समोर आई वच्छला किसन उदावंत असे एकत्र राहतोत मी सोनेगाव ता. जामखेड येथे शिक्षिका म्हणुन नोकरी करुन त्यावर परीवाराचा उदरनिर्वाह करते.

माझे पती रमेश शहाणे हे माझे सासरी आशा टॉकीज शेजारी बीड ता. जि. बीड येथे राहतात. माझे गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर येथिल घर हे बंद असते मी सुट्टीच्या दिवशी जामखेड येथे येत असते.दिनांक – 31/08/2024 रोजी सायंकाळी 07/00 वा. सुमारास मी व माझी आई वच्छला असे आम्ही माझे करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर येथिल घर बंद करुन कुलुप लाऊन माझा भाऊ राजेंद्र किसन उदावंत याचे घरी रा. महावीर मंगल कार्यालय समोर जामखेड ता. जामखेड येथे गेलो होतो.

त्यानंतर जेवण करुन तेथेच झोपलो. दिनांक 01/09/2024 रोजी सकाळी 06/45 वा. सुमारास मी व माझी आई वच्छला असे आम्ही माझे करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर येथिल घरी गेलो असता मला गेट तुटलेले दिसले व घराचा दरवाजाचे कुलुप व कडी कोंडा तुटलेला दिसला.

मी घरात जाउन पाहिले असता घरातील कपाटाचे कुलूप तोडुन कपाटाने नुकसान करुन, कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले व टी.व्ही. फुटून नुकसान झालेले दिसले. त्यानंतर मी कपाटामध्ये माझे पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे पाहिले असता ते मिळुन आले नाहीत व सोन्याचे दागिने केल्याच्या पावत्या देखील मिळुन आल्या नाही. त्यानंतर मी व माझी आई वच्छला असे आम्ही आजुबाजुला परीसरात शोध घेतला असता दागिने व पैसे मिळुन आले नाही. त्यानंतर आमची खात्री झाली की, माझे सोन्याचे दागिने व पैसे काणीतरी चोरुन नेले आहेत.

चोरी झालेल्या मालमत्तेचे वर्णन खालील प्रमाणे.
1)80,000/- रु. कि.चे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठन जु. वा. किं.अं.
2) 16,000/- रु. कि.ची. 04 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जु.वा.किं.अ.
3)20,000/- रु.कि.ची.05 ग्रॅम वजणाची सोन्याची अंगठी जु.वा. किं.अं.
4) 10,000/- रुपये रोख रक्कम त्यात 500 रुपये दराच्या 20 नोटा.5)00,00/- रु. कि. चे सोन्याचे दागिन्याच्या पावत्या किं.अं.

असे एकूण 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे करत आहेत.

पोलिसांनी काल श्वान पथकाला पाचारण केले होते. फिगंरप्रिट घेऊन गेले आहेत. लवकरात लवकर चोरीचा तपास लावण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!