जामखेड प्रारूप विकास आराखडा विरोधात तब्बल 465 तक्रारी

0
1170

जामखेड न्युज——

जामखेड प्रारूप विकास आराखडा विरोधात तब्बल 465 तक्रारी

जामखेड शहराचा विकास झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रारूप विकास आराखडा होणे अपेक्षित होते जामखेड नगरपरिषद प्रशासनाने व नगर रचना विभागाने सध्या तयार केलेला आराखडा हा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने नसून जामखेड शहर भकास करण्याचा हा आराखडा आहे. असे तक्रार कर्ते यांनी सांगितले. प्रारूप विकास आराखडा विरोधात काल आणि आज दोन दिवसांत सुमारे 465 विक्रमी तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली. 

जामखेड शहरातील गोरगरीब, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, पदवीधर सर्व क्षेत्रातील बहुसंख्य शहरवासीयांच्या विरोध असून या आराखड्या विरोधात जामखेड कर जन आंदोलन उभे करत आहेत, जामखेड शहरातील किमान १५००० लोक बाधित होत आहेत त्यांना अंधारात ठेवून नगर परिषद हा आराखडा लोकांवर लादत आहे आणि यासाठी समस्त जामखेड कर न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी व हा अन्यायकारक आराखडा रद्द करुन जामखेडकरांना विश्वासात घेऊन नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकारी यांची निवड झाल्यावर नव्याने आराखडा बनवावा अशी मागणी तक्रार कर्ते यांची आहे.

यासाठी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समिती तयार तयार करण्यात आली आहे. ती
पुढील प्रमाणे तयार करण्यात आली आहे. प्रा. मधुकर आबा राळेभात (अध्यक्ष), आकाश दिलीपशेठ बाफना(कार्याध्यक्ष), ॲड.शमा हाजी काझी साहेब (उपाध्यक्ष ),  अमित अरुणशेठ चिंतामणी (उपाध्यक्ष),  विनायक विठ्ठलराव राऊत (सचिव),  राहुल अंकुश उगले  (सहसचिव), अविनाश दशरथ साळुंके (खजिनदार), अमोल रमेश गिरमे (समन्वयक), सन्मानीय सदस्य अशोक जावळे,  डॉ.संजय राऊत,  राजेंद्र देशपांडे सय्यद जावेद अली,  विजय गव्हाणे हे जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीत आहेत.

जामखेड नगरपरिषदेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्याकलम २६ (१) मधील तरतूदीनुसार जामखेड नगरपरिषद हद्दीची प्रारूप विकास योजना तयार करुन त्यासंबंधीची सूचना उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये दि.२०.०१.२०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द केली आहे.आणि ज्याअर्थी, उक्त क्षेत्राच्या प्रसिध्द प्रारुप विकास योजनेसाठी, उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२)अन्वये गठीत करावयाच्या नियोजन समितीमध्ये स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने व प्रशासक काम पाहत असल्याने मा.प्रशासक व नगर आणि प्रदेश रचना किंवा पर्यावरण किंवा दोन्हींशी संबंधित असणाऱ्या बाबींचे विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव अशा, नगर रचना संचालकांनी नियुक्त करावयाच्या चार पेक्षा अधिक नसतील इतक्या,व्यक्तींचा समावेश असणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीला नगरपरिषदेची स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने स्थायी समितीच्या जागी मा. प्रशासकयांच्या नेमणुकीस जामखेड नगरपरिषदेच्या प्रशासकीय ठराव क्र. ५३ दि. १७.०१.२०२४ अन्वये मान्यता दिलेली असून मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आदेश क्र. जा. क्र. प्रा.वि.यो. जामखेड जि. अहमदनगर /नियोजन समिती / कलम २८ (२) / टिपीव्ही – ४ / १५८३ दि. ११.०३.२०२४ अन्वये समितीवर ३ तज्ञ व्यक्तींची नेमणुक केलेली आहे.

नियोजन समिती सदस्य नावे पुढीलप्रमाणे आहेत
संतोष दत्तात्रय धोंगडे- सहायक संचालक, नगर रचना (सेवानिवृत्त) नगर, अनंत त्र्यंबक धामणे –
रचना (सेवानिवृत्त) नगर, किरण रामचंद्र वाघे – परवाना धारक अभियंता, नितीन पाटील प्रशासक – प्रशासक, जामखेड नगरपरिषद तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत भाग, कर्जत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here