जामखेड न्युज ——-
साकत घाटात ट्रक पलटी, घाट रूंदीकरण करण्याची मागणी
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात. सकाळी बीड वरून सरकी पेंड जामखेड ला येत असलेला ट्रक घाटात ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला यात चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे नुकसान झाले आहे.
लहू शिवाजी मिसाळ यांच्या मालखीचा ट्रक असून ते स्वतः बीड वरून बारा टन सरकी पेंड घेऊन येत होता. पहाटे घाटात ट्रक असतात अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवून खालील वळणावर टेकडीवर घातला. यात गाडीची पलटी होऊन सरकी पेंड सांडली दुसरी गाडी आणून पेंड त्यात भरली याच चालक मिसाळ किरकोळ जखमी झाला असून गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.
एका वर्षात साकत घाटात दहा ते बारा अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे.
सध्या सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच साकत फाटा ते धोत्री पर्यंत रस्त्यावर अनेक झाडांचे फाटे रस्त्यावर आलेली आहेत. त्याची छाटणी करावी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आशी मागणी हरीभाऊ पोपट मुरूमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.