विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा रोहित पवारच आमदार होणार – सरपंच हनुमंत पाटील

0
615

जामखेड न्युज——

विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा रोहित पवारच आमदार होणार – सरपंच हनुमंत पाटील

 

आमदार रोहित पवार आमदार झाल्यानंतर मतदारसंघात अनेक विकास कामे आणली, ग्रामीण रुग्णालय शंभर खाटांचे भव्य दिव्य इमारत, पंचायत समिती हेड क्वार्टर, पोलीस क्वार्टर, नगरपरिषद इमारत, नागेश्वर मंदिर रस्ता, बचत गट, निर्धुर चूल वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, आरोग्यशिबीरे, नेत्र शिबिरे, महिलांसाठी चे आरोग्य शिबिरे एक ना कित्येक, तसेच जलसंधारण, पाणीपुरवठा, नागरीसुविधा, शिक्षणसंबंधी बालगोपाळापासून, युवकांपर्यंत आमदार रोहितदादांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेत हजारो सायकलींचे वाटप मतदारसंघात करून माय-माऊलींचे अश्रू पुसण्याचे काम केले यामुळे जनसामान्य लोकांच्या मना मनात आमदार रोहित पवारच आहेत कोणी कितीही गप्पा मारल्या किंवा विरोधात कोणीही असले तरी विकास कामाच्या बळावर परत आमदार रोहित पवारच बाजी मारणार व आमदार होणार असा विश्वास साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार रोहित पवार आमदार होण्या आगोदर मतदारसंघात अनेक समस्या होत्या विकास कामाचा बोजवारा उडाला होता. मोठ्या प्रमाणावर
भ्रष्टाचार, कुचकामी सामाजिक व्यवस्था, ढासळलेली कायदा व सुरक्षा, महिलांवरील अत्याचार या सर्व बाबीत कर्जत-जामखेड चा क्रमांक वर होता. २०१९ ला सूत्रे रोहितदादानी हातामध्ये घेतली आणि अवघ्या काही महिन्यात आपल्या कामाची चुणूक दाखवून बहुतांशी समस्या वैयक्तिक पातळीवर निपटल्या व शांत जामखेड विकासाच्या मार्गावर असणारे जामखेड अशी ओळख निर्माण झाली.

वर्ष २०२० साली कोरोना चे अस्मानी संकट आले. रोहितदादांनी विविध पातळीवर उपाययोजना करत कोरोनासारख्या गंभीर संकटापासून आपल्या नागरिकांना वाचविले. आपल्या विविधांगी नेतृत्वगुणाने मतदारसंघात चौफेर विकासगंगा आणण्यासाठी प्रयत्न केले(किंबहुना करत आहेत) त्यामध्ये आरोग्यशिबीरे, नेत्र शिबिरे, महिलांसाठी चे आरोग्य शिबिरे एक ना कित्येक, तसेच जलसंधारण, पाणीपुरवठा, नागरीसुविधा,
शिक्षणसंबंधी बालगोपाळापासून, युवकांपर्यंत
आमदार रोहितदादांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेत हजारो सायकलींचे वाटप मतदारसंघात करून माय-माऊलींचे अश्रू पुसण्याचे काम केले. खरंच अविश्वसनीय आहे. याच बळावर परत जनता जनार्दनाचा आशिर्वाद आमदार रोहित पवार यांनाच मिळणार आहे.


दळणवळण संबंधित राष्ट्रीय महामार्ग, मतदारसंघात अंतर्गत रस्ते आणि पावसाळ्यात अडचणीच्या रस्त्यांवर पूल, महत्वाच्या पाणंद योजना ही यादी कमी पडेल. युवांसाठी रोजगार मेळावे, आणि सर्वात जिव्हाळ्याचा कित्येक वर्षे रखडलेला एम. आय.डी. सी. चा प्रश्न निकाली काढला.

दादांनी केलेली विकासकामे इथे लिहुन पूर्ण होऊ शकत नाहीत. कोरोना संकटाची दोन वर्षे सोडता अवघ्या तीन वर्षात, मतदारसंघाचा आमदार रोहितदादांनी सरकार दरबारी आणि वैयक्तिक पातळीवर प्रश्न सोडवत कायापालट करण्याचे काम केले आहे.

आता २०२४ विधानसभा निवडणुकीचे आवाहन आमदार रोहितदादा पवार यांच्यासमोर आहे असे विरोधकांना वाटते परंतु सर्वसामान्य मतदार जो दिवसरात्र दादांनी केलेली अपार मेहनत पाहत आला आहे त्याच्यादृष्टीने रोहितदादा आपले तहहयात लोकप्रतिनिधी असावेत असे वाटते. परंतु काही विघ्नसंतोषी लोक वैयक्तिक स्वार्थासाठी विधानसभा लढण्याचे स्वप्न पाहत असून त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.

स्वपक्षातील ज्यांना कोणाला निवडणूक लढवण्याची हौस आहे त्यांनी पक्षीय बंधने सोडून आपली लोकप्रियता तपासावी, आपण आतापर्यंत जनतेसाठी काय केले आहे हे पाहावे त्यांनी एकदा निवडणूक लढवावी आणि एकदाचे दूध का दूध और पाणी का पाणी होऊनच जाऊ द्या असे आवाहन साकतचे सरपंच हनुमंत साहेबराव पाटील (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here