जामखेड न्युज——
लहान मुलांच्या खेळणीची चिंता मिटली
जामखेड शहरात अद्ययावत कुंदन टॉईज च्या रूपाने खेळणी शोरूम सुरू
लहान मुलांना काय खेळणी घ्यावी कोठून घ्यावी हा प्रश्न नेहमीच पालकांसमोर असतो. आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण जामखेड शहरात कुंदन टॉईज च्या रूपाने सागर गुंदेचा व किरण मुळे यांनी अद्ययावत असे खेळणी शोरूम सुरू करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या व योग्य किंमतीच्या खेळणी उपलब्ध आहेत.
कमीत कमी 50 ते 20,000 रूपये अशा स्वरूपात खेळणी उपलब्ध आहे.
जामखेड शहरात जुन्या बस स्टॅन्डसमोर कुंदन टॉईज शोरूमचे उद्घाटन शुक्रवार दि. 9 आँगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता युवराज भाऊ काशिद (अध्यक्ष मराठी भाषिक संघ मध्यप्रदेश) यांच्या शुभहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाले.
यावेळी मनीष काका चोरट, विकी भाऊ सदाफुले, भाजपा तालुकाध्यक्ष अजय दादा काशीद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काका काशीद, प्रसिद्ध उद्योगपती दिलीप शेठ गुगळे, शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे, सुनील शेठ कोठारी, संतोष गुंदेचा, संजय कोठारी, गोरख धनवट, महेश निमोणकर, हवा दादा सरनोबत, योगेश जी भंडारी, मंगेश बेदमुथ्था, बालाजी मुळे, डॉ. सुशील पन्हाळकर, देविदास पवार, बाळासाहेब जगदाळे, संतोष गव्हाळे, सनी सदाफुले, बोराडे साहेब, सुग्रीव सांगळे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, सहसचिव पप्पूभाई सय्यद यांच्या सह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळणी आणि बालपण यांच्या आठवणी वेगळ्याच असतात. खेळण्यांशी खेळता खेळताच मुले आपल्या शरीराचा आणि मेंदूचा वापर करायला शिकतात. त्यातूनच त्यांना शिस्त लागते, इतरांशी सलोख्याने वागणे, जबाबदारीची जाणीव अशा गोष्टी मुले नकळतच शिकतात.
खेळणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे. खेळल्याने शरीर सुदृढ बनण्यास मदत होते. मुलांची एकाग्रता वाढण्यासाठीही मदत होते. शिवाय बालपणाचा आनंद मनमुराद लुटता लुटता बाल विकासही होतो. यामुळे जामखेड करांसाठी कुंदन टॉईज शोरूमच्या रूपाने अद्ययावत दालन सुरू झाले आहे.