जामखेड न्युज——
अनेक वर्षांपासून बंद असलेला देवदैठण ते भोरे मळावस्ती रस्ता खुला
माजी सरपंच अनिल भोरे यांच्या प्रयत्नांनी व प्रशासनाच्या सहकार्याने रस्ता मोकळा
तालुक्यातील देवदैठण येथील देवदैठण ते भोरे मळा वस्ती रस्त्याचा सुमारे 50 ते 60 वर्षापासून चा प्रलंबित होता यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. माजी सरपंच अनिल भोरे यांनी यासाठी प्रयत्न केला. परिसरातील लोकांना विश्वासात घेऊन प्रशासनाच्या सहकार्याने रस्ता मोकळा केला.
एका ठिकाणी मोठा नाला होता तेथे सिमेंटच्या नळ्या टाकून रस्ता करण्यात आला. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांची येण्या जाण्याची सोय झाली आहे.
रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार गणेश माळी
यांच्या आदेशानंतर सर्कल शिरसाट तलाठी वसते तसेच खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय झांझाड यांच्याज्ञमार्गदर्शनाखाली बंदोबस्तात सदरील रस्ता हा रहदारीसाठी स्थानिक शेतकरी बांधवांसाठी खुला करण्यात आला.
सदरील रस्ता खुला झाल्यामुळे येथील सर्व रहिवासी शेतकरी बांधवांनी तहसीलदार गणेश माळी तसेच पोलीस प्रशासन खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड साहेब ,पो. हेड कांस्टेबल सय्यद, बड़े, आणि महिला काँन्टेबल यांचे आभार मानले.
अशी माहिती देवदैठणचे माझी सरपंच अनिल दादा भोरे भोरे व पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ भोरे वस्ती यांनी प्रसिद्धीस देऊन प्रशासनाचे आभार व्यक्त केले रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली.