Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवार यांच्या जनसंवाद दौऱ्यात तक्रारीचा पाऊस, पवारांनी जाग्यावरच केले तक्रारीचे...

आमदार रोहित पवार यांच्या जनसंवाद दौऱ्यात तक्रारीचा पाऊस, पवारांनी जाग्यावरच केले तक्रारीचे निवारण लक्ष्मीबाई पवार यांच्या गाण्याने पवार भावूक

0
1582

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार यांच्या जनसंवाद दौऱ्यात तक्रारीचा पाऊस, पवारांनी जाग्यावरच केले तक्रारीचे निवारण

  • लक्ष्मीबाई पवार यांच्या गाण्याने पवार भावूक

 

आमदार रोहीत पवार यांच्या संवाद दौऱ्यात नागरीकांनी वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारीचा पाऊस पाडला या सर्व समस्यावर अधिका-यांना बोलून निराकारण केले. आदीवासी महिलेला कोरोना काळात आ. रोहीत पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल तिने व्यक्त केलेली कृतघ्नता व जामखेड तालुक्यातील पाडळी येथील लक्ष्मीबाई पवार या आजीबाईने आ. रोहीत पवार यांच्यावर गायलेल्या गाण्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. दिवसभराच्या सवांद दौऱ्या नंतर आ. रोहीत पवार यांनी जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्यात झांज वाद्य वाजवून अष्टपैलूची चुणूक दाखवली. आ. रोहीत पवार यांचा चोभेवाडी येथे जनसंवाद दौरा गुरुवारी संपन्न झाला. यावेळी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, यवक तालुका कार्याध्यक्ष अशोक पठाडे, आजीनाथ कुमटकर, अमर चाऊस, नान्नजचे माजी सरपंच संतोष पवार, भिमराव मोहळकर, बाळासाहेब गोरे, संतोष कुमटकर, प्रवीण उगले, संदीप गायकवाड, दिपक कुमटकर व मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी अनेक शेतक-यांनी पिकविम्याचे पैसे मिळाली नाही अशी तक्रार केली. यावेळी आ. रोहीत पवार म्हणाले पिकविम्याचे पैसे मिळवण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवला त्यामुळे अनेक शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा झाले. उर्वरित पैशासाठी विमा कंपनी बरोबर बोलून प्रश्न मार्गी लावू, चेन्नई सुरत हा नियोजित महामार्ग अरणगाव व नान्नज येथून जात आहे तेथील जागेचे पंचनामे तसेच शेतातील फळबाग जाणार असल्याने पंचनामे करावे अशी मागणी केली असता आ. रोहीत पवार यांनी उपविभागीय अधिकारी यांना फोन लावून पंचनामे करण्याबाबत सांगितले.


जवळा ते खर्डा हा रस्ता पुर्ण झाला असून नान्नज ते शेळगाव या रस्त्याचे अडीच कि. मी. काम बाकी आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली. विजेची समस्या, वाढीव दराने बियाणे विक्री, गावातील रस्ते, घरकुल, विहीरी याबाबत तक्रारी नागरिकांनी केल्या. यानंतर आ. रोहीत पवार यांनी खुंटेवाडी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सायंकाळी जामखेड शहरातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मिरवणूकीत सहभागी होऊन झांझ वाद्य वाजवले.

चौकट

चोभेवाडी येथील आदीवासी समाजातील महिला कमलाबाई काळे हिने कोराना काळात कोरोना झाला त्यावेळी दवाखान्यात घेतले नाही त्यावेळी आ. रोहीत पवार यांना फोन केला असता ते कर्जत वरून नान्नजला आले व त्यांनी मला डॉ. आरोळे हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी दाखल केले इंजेक्शन व औषध मिळाली यामुळे जगले हा क्षण मोठा असून मी जिवंत असेपर्यंत त्यांनाच मतदान करणार आहे असे सांगताना भारावून गेल्या होत्या सदर आदीवासी महिला अडीच वर्षांनंतर भेटून कृतघ्नता व्यक्त केल्यामुळे आ. पवार भारावून गेले होते

.
चौकट

तालुक्यातील पाडळी येथील लक्ष्मीबाई पवार या आजीबाईने आ. रोहीत पवार बारामती येथून येऊन कर्जत जामखेडचे आमदार झाले त्यांनी तालुक्यात केलेले विकासकामे व सर्वसामान्य नागरिकांना बरोबर असलेले समंद याबाबत आपल्या आवाजाच्या शैलीत गाणे गाऊन उपस्थितांचे मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!