जामखेड न्युज——
भूम प्रतिनिधी
अनिल पन्हाळकर यांचे हृदयकिकाराच्या झटक्याने निधन
अनिल महादेव पन्हाळकर ( वय ५५ ) वाल्हा ता. भूम जिल्हा धाराशिव हल्ली मुक्काम लोणी काळभोर यांचे गुरूवार दि. ६ रोजी चहा घेत असताना दुपारी साडेतीन वाजता हृदयकिकाराच्या झटक्याने निधन निधन झाले यामुळे पन्हाळकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज शुक्रवार दि. ७ रोजी शोकाकुल वातावरणात सकाळी आठ वाजता वाल्हा येथे पन्हाळकर वस्तीवर अंत्यविधी झाला.
मुळचे वाल्हा येथील असणारे पन्हाळकर कुटुंबातील दोन भाऊ बऱ्याच दिवसांपासून पुण्यात स्थायिक झाले होते. तर दोन भाऊ वाल्हा येथे वीस वर्षांपूर्वी एका भावाचे निधन झाले होते. नंतर अडीच वर्षांपूर्वी वाल्हा येथील भावाचे निधन झाले. आणि आता अनिल पन्हाळकर यांचे निधन झाले आहे. एक भाऊ दत्ता पन्हाळकर पुणे येथे कंपनीत नोकरीला आहेत.
अनिल पन्हाळकर हे पुणे येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत ड्रायव्हर म्हणून कामाला होते. गुरूवारी सकाळी कामाला गेले होते. साडेतीन च्या आसपास हाॅटेल मध्ये चहा घेत असताना अचानक चक्कर आली ताबडतोब लोणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. सायंकाळी पुणे येथे शवविच्छेदन करून आज शुक्रवार सकाळी वाल्हा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल पन्हाळकर हे खुपच मनमोकळेपणाने सर्वाशी मिळून मिसळून वागत होते. त्यांच्या जाण्याने पन्हाळकर कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.