Saturday, March 7, 2026
Home ताज्या बातम्या लग्न 2 मे ला दशक्रिया विधी 2 जूनला, मिसाळ कुटुंबियांवर दुर्दैवाचा फेरा

लग्न 2 मे ला दशक्रिया विधी 2 जूनला, मिसाळ कुटुंबियांवर दुर्दैवाचा फेरा

0
2097

जामखेड न्युज——

लग्न 2 मे ला दशक्रिया विधी 2 जूनला, मिसाळ कुटुंबियांवर दुर्दैवाचा फेरा

 

जामखेड तालुक्यातील साकत (हनुमान वस्ती) येथील सुरज महादेव मिसाळ वय २२ याचे अल्पशा आजाराने हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी दि. 24 मे रोजी सायंकाळी निधन झाले होते दोन मे रोजीच लग्न झाले होते. आणि आता दशक्रिया विधी दोन जूनला येत आहे. दुर्दैवाचा असाही फेरा मिसाळ कुटुंबिय व मित्रपरिवारावर कोसळलेला आहे.

सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल चालवत होता. काल मेडिकल मधुन घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. 24 रोजी सायंकाळी निधन झाले होते.

सुरजचे बावीस दिवसांपूर्वी 2 मे रोजी लग्न झाले होते. सुरजला बरे वाटत नाही म्हणून बीड येथील दवाखान्यात काही दिवस उपचार घेतले होते. बीड वरून आल्यावर बरे वाटल्याने  तो 24 मे रोजी मेडिकल मध्ये गेला होता. सायंकाळी घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने जामखेड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत तो मयत झाला होता.

25 मे रोजी सकाळी सात वाजता हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सुरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली होती. आता दशक्रिया विधी दोन जूनला येत आहे. लग्न दोन मेला झाले होते. 

सुरजच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ व बहिण असा परिवार आहे. सुरजचा दुर्दैवी अंत झाल्याने आई – वडिल, बहिण, भाऊ, पत्नी, नातेवाईक व मित्र परिवाराच्या दु:खाला सीमा राहिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!