जामखेड न्युज——
नगर शहरात मतदान केंद्रावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, सुविधा कागदपत्रीच, अधिकारी कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात हाल

निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचार्यांना सर्व मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात अशा आयोगाच्या स्पष्ट सूचना असताना नगर शहरातील अनेक मतदान केंद्रावर मुलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला दिसला, टेबल, खुर्च्या, लाईट, पाणी या सुविधा बरोबरच शौचालयाची बिकट अवस्था होती. काही ठिकाणी तर साधा चहा देखील उपलब्ध झाला नाही जेवण तर दुरच काही मतदान केंद्र हे घाणीच्या विळख्यात होते यामुळे कर्मचाऱ्यांचे खुपच हाल झाले.

प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर सर्व सुविधा पुरविण्यात येतील अशा सूचना देण्यात आल्या होत्या पण सुविधा कागदोपत्रीच राहिल्या प्रत्यक्षात बाहेर गावाहून आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तुटपुंज्या साधनांच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडली गेली पण शहरातील मतदान केंद्रावर सुविधांचा आभाव मग प्रशासनाने कशाच्या आधारे त्या ठिकाणी मतदान केंद्र उभारले सुविधा का उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे.

नगर शहरातील जिल्हा परिषद फकिरवाडा (भिंगार) या शाळेत पाच मतदान केंद्र होते. पाच केंद्रासाठी पंचवीस अधिकारी कर्मचारी तर सुरक्षारक्षक म्हणून बारा पोलीस कर्मचारी होते यात काही महिला कर्मचारी पण होत्या मतदान साहित्य घेऊन जाण्या येण्यासाठी बसची सुविधा होती. बससाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता पाचशे मीटर दूरच बस थांबली म्हणजे अर्धा किलोमीटर अंतर सर्व साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी यांना पावसात भिजत पायी जावे लागले. मतदानानंतर पण परत अर्धा किलोमीटर अंतरावर साहित्य आणावे लागले. बस जात नाही तर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का केली नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

फकिरवाडा (भिंगार) मतदान केंद्रावर आल्यावर पाहिले तर टेबल खुर्ची याची वाणवा होती. उपलब्ध साहित्यासह निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागली. टेबल खुर्च्या उपलब्ध झाल्या नाहीत. पाच मतदान केंद्रांवर अधिकारी कर्मचारी व पोलीस असे सुमारे चाळीस जण उपस्थित होते. यात काही महिलाही होत्या संपूर्ण शाळेत एकच शौचालय होते त्यालाही दार नव्हते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांची खुपच कुचंबणा झाली. कर्मचारी दुपारी एक वाजता मतदान केंद्रावर पोहोचले होते कर्मचारी यांनी फिरत्या शौचालयाची प्रशासनाकडे मागणी केली पण प्रशासनाने मतदानादिवशी सकाळी नऊ वाजता फिरते शौचालय आणले. शाळेच्या जवळच डंपिंग ग्राउंड होते त्याची दुर्गंधी सर्व केंद्रावर येत होती. पाणीही उपलब्ध नव्हते नंतर पाण्याचा टँकर पाठवला यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना खुपच त्रास सहन करावा लागला.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना काही मतदान केंद्रावर फक्त कागदोपत्रीच सुविधा होत्या प्रत्यक्षात कसल्याही सुविधा नव्हत्या.
मतदान केंद्रावर चहा तसेच जेवणाची कसलीही सुविधा उपलब्ध नव्हती यामुळे नगर शहरातील काही मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी यांना खुपच त्रास सहन करावा लागला. मिटिंग मध्ये वेगळ्या सूचना दिल्या प्रत्यक्षात साहित्य जमा करताना वेगळ्या पद्धतीने जमा करून घेत होते. जमा करतानाही मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला अशी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आहे.
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असतो मग सुविधांचा बोजवारा का उडतो पाणी कुठे मुरते असा प्रश्न विचारला जात आहे.





