Saturday, March 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड बसस्थानकातून विवाहित महिला बेपत्ता, सापडल्यास जामखेड पोलीसांशी संपर्क साधा

जामखेड बसस्थानकातून विवाहित महिला बेपत्ता, सापडल्यास जामखेड पोलीसांशी संपर्क साधा

0
5057

जामखेड न्युज——

जामखेड बसस्थानकातून विवाहित महिला बेपत्ता, सापडल्यास जामखेड पोलीसांशी संपर्क साधा

जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील विवाहित महिला (वय १९ ) १२ एप्रिल रोजी जामखेड बसस्थानकातून बेपत्ता झाली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

संस्कृती युवराज काकडे (वय १९ ) जामखेड तालुक्यातील  बोर्ले येथून बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव मायंबा येथे माहेरी सासरे बापुराव हौसराव काकडे यांच्या बरोबर यात्रेसाठी १० एप्रिल रोजी गेली होती ११ तारखेला यात्रा झाल्यावर १२ तारखेला बोर्ले सासरी येण्यासाठी निघाली बरोबर सासरे बापुराव हौसराव काकडे होते. जामखेड बसस्थानक येथे आल्यावर सासरे बापुराव यांना फळे आणण्यासाठी लावले फळे घेऊन बापुराव परत आले पण सुन दिसली नाही शोधाशोध घेतली पण संस्कृती काकडे बेपत्ता झाली आहे असे कळले. तेव्हा सासरे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला माहिती दिली. 

दोन वर्षांपूर्वी संस्कृती हिचे युवराज बरोबर लग्न झाले होते. दोन वर्षातच जामखेड बसस्थानकातून बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बेपत्ता झाल्याची खबर बापुराव हौसराव काकडे यांनी जामखेड पोलीसांना दिली यानुसार पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष कोपनर हे तपास करीत आहेत.

चौकट
संस्कृती युवराज काकडे वय १९ हि कोठे कोणाला आढळल्यास जामखेड पोलीस स्टेशनला खालील नंबर वर संपर्क करावा. जामखेड पोलीस स्टेशन 02421- 221033
पोलीस नाईक संतोष कोपनर मोबाईल नंबर
9552507599 असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!