जामखेड न्युज——
बापुसाहेब शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार

तालुक्यातील पिंपरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते अजित (दादा) पवार यांचे खंदे समर्थक बापुसाहेब शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित (दादा) पवार) गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव, तसेच जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत सह अनेक मित्रमंडळ व हितचिंतकांनी शिंदे यांचा जाहीर सत्कार केला आहे.

आज सकाळी देऊळगाव चे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य यांनी सदिच्छा भेट दिली व शिंदे यांचा जाहीर सत्कार केला व शुभेच्छा दिल्या
यावेळी देऊळगावचे सरपंच शरद गलांडे उपसरपंच संतोष कोठारे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बाबर ग्रामपंचायत सदस्य महेश गायकवाड ज्येष्ठ संचालक महादेवराव बाबर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, सिद्धीविनायक वीट उत्पादक संस्थेचे मालक राजेंद्र शिंगणे, सागवीचे युवा नेते चरण कदम, रत्नापूर चे अजितदादा गटाचे खंदे समर्थक पांडुरंग ढवळे, संजय कांबळे यांनीही सन्मान केला.

जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जामखेड शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील प्रश्नांची जाण असणारे, कार्यकुशल नेते अजित (दादा) पवार यांचे विचार त्यांचे काम तळागाळापर्यंत पोहचविणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न दादांच्या एका फोनवर लगेच मार्गी लागतात. तालुक्यात अजित दादा गटाचे काम सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभावीपणे करणार आहोत.






