जामखेड न्युज——
गुणवत्तेची खाण अशी ओळख श्री. साकेश्वर विद्यालयाने निर्माण करावी – प्राचार्य श्रीराम मुरूमकर

साकत गावात शिक्षणाच्या जोरावरच अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिच ओळख कायम टिकवून साकेश्वर विद्यालयाने तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आपला वेगळा ठसा निर्माण करावा, गुणवत्ता वाढीसाठी सर्व ग्रामस्थ आपणास हवे ते सहकार्य करतील त्यामुळे विद्यालयाने गुणवत्तेची खाण म्हणून ओळख निर्माण करावी असे मत प्राचार्य श्रीराम मुरूमकर यांनी व्यक्त केले.

श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक अशोक घोलप सर यांचा सेवापुर्ती सोहळा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानावरून प्राचार्य श्रीराम मुरूमकर बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दि, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे, हभप उत्तम महाराज वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सरपंच महादेव मुरूमकर, रामचंद्र वराट गुरूजी, ज्ञानदेव मुरूमकर, प्राचार्य श्रीकांत होशिंग, रमेश अडसूळ, श्रीधर जगदाळे, उपमुख्याध्यापक बी. ए. पारखे, पर्यवेक्षक पी. टी. गायकवाड, पोलीस पाटील महादेव वराट, शहादेव वराट, गणेश वराट, बाळासाहेब वराट, प्रा. दादासाहेब मोहिते,भरत लहाने, पोपट जगदाळे, बबन राठोड, श्री साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, महादेव मत्रे, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, बळीराम लोहार, रविंद्र घोलप, शशिकांत घोलप, बालाजी नेमाने, आश्रू नेमाने, दिलीप घोलप, महारुद्र नेमाने सेवा पुर्ती सोहळ्याचे सत्कार मुर्ती अशोक घोलप, पत्नी बेबी घोलप, मुलगा रविंद्र घोलप, शशिकांत घोलप सह नातेवाईक व मित्रपरिवार व अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीराम मुरूमकर म्हणाले की, साकतची ओळख शिक्षकांचे गाव म्हणून आहे. गावातील शैक्षणिक वातावरण चांगले आहे. गुणवत्ता वाढीसाठी ग्रामस्थ सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी तयार असतील जून पासुन गुणवत्ता वाढ प्रकल्प राबवू असे सांगितले.

यावेळी बोलताना दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख म्हणाले की,
जून पासून श्री साकेश्वर विद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविला जाईल.

सेवापुर्ती सोहळ्याचे सत्कार मुर्ती अशोक घोलप म्हणाले की, गेली २६ वर्षे मी श्री साकेश्वर विद्यालयात इमाने इतबारे सेवा केली, याच विद्यालयात नोकरीची सुरूवात केली व सेवापुर्ती याच विद्यालयात होत आहे. विद्यार्थी हेच दैवत मानून काम केले.

घोलप सरांविषयी लक्ष्मी वराट, ऋतुजा वराट, दादासाहेब मोहिते, रविंद्र घोलप, रामचंद्र वराट गुरूजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले. शेवटी सर्वाना स्नेहभोजन देण्यात आले.





