लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहिण व भाची अपघातात जागीच ठार

0
2385

जामखेड न्युज——

लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहिण व भाची अपघातात जागीच ठार

 


महिनाभरावर लग्न आलेला नवरदेव लग्नाचा बस्ता बांधून निघालेला असताना त्याची बहीण व वर्षाची भाची, असे तिघे अपघातात जागीच मृत्यू पावले. मृत दुचाकीवरून लग्नाचा बस्ता खरेदीसाठी जात असताना बसशी अपघात घडला. बीडच्या अंबाजोगाईनजीकच्या वाघाळा पाटीजवळ रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.


एप्रिल मध्ये लग्न असल्याने बस्ता बांधून भावी नवरदेव आपली बहीण आणि चिमुकली भाची असे दुचाकीवरून परतताना वाघाळा फाटा ( ता. अंबाजोगाई ) जवळ एसटी ने दुचाकीला धडक दिली. धडक देताच एसटीच्या खाली येऊन दुचाकीवरील तिघेही ठार झाल्याची घटना रविवारी ( दि. ३१ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. भावी नवरदेवासह बहीण,भाची ठार झाल्याने लग्नाच्या आनंदात असलेल्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

सेवालाल पंडित राठोड ( वय २१ वर्ष ) रा. बिटर गाव तांडा ( ता. रेणापूर जि. लातूर ), बहीण दिपाली सुनील जाधव ( वय २० वर्ष ) रा. राडी तांडा ( ता. अंबाजोगाई ), भाची त्रिशा ( वय १ वर्ष ) असे या अपघातातील मृतांची नावे आहेत. सेवालाल राठोड याचे २८ एप्रिलला लग्न ठरलेले होते. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. अंबाजोगाई येथे लग्नाचा बस्ता बांधून सायंकाळी बहीण व भाचीला घेऊन परत जात होता.

दरम्यान वाघाळा पाटी ( अंबा साखर कारखाना ) जवळ आला असता लातूर-औरंगाबाद एसटीने दुचाकीला जोरदार धडक दिली.


धडक बसताच दुचाकी एसटीच्या खाली येऊन बऱ्याच अंतरावर फरफटत गेली. यामुळे जबर मार लागून दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले. हा अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडल्याची घटनास्थळी उपस्थित नागरिक हळहळ व्यक्त करत होते. एकुलते एक असलेली मुले कायमचे गेल्याने आईवडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here