जामखेड न्युज——
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पवारवस्ती (पाडळी ) शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
शाळेसाठी ७३,६७० रूपयांचा समाज सहभाग जमा
जिल्हा परिषद पाडळी शाळेतील इयत्ता चौथी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली कुमारी गौरी घनश्याम भोसले तसेच जामखेड तालुका गुणवत्ता यादीतील तीन मुलांचा गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेब धनवे साहेब यांनी पालकासमवेत गुणगौरव करुन इयत्ता पाचवी स्कॉलशिप नवोदय परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. शाळेसाठी एकुण ७३,६७० रूपयांचा समाज जमा झाला.
गुरुवार दि. २८/०३/ २०२४ सायंकाळी ८:०० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांत मिशन स्कॉलरशिप नवोदय अंतर्गत इयत्ता चौथी मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली कुमारी गौरी घनश्याम भोसले जामखेड तालुका गुणवत्ता यादीतील तीन मुलांचा गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेब धनवे साहेब यांनी पालकासमवेत गुणगौरव करुन इयत्ता पाचवी स्कॉलशिप नवोदय परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री. राम निकम साहेब, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. ज्योतीताई बेल्हेकर मॅडम , शिक्षक बँक संचालक श्री संतोष राऊत, विकासमंडळ विश्वस्त श्री.मुकुंदराज सातपुते आदर्श शिक्षक एकनाथ (दादा) चव्हाण, पांडूरंग मोहळकर , काकासाहेब कुमटकर , राजेंद्र मडके , बाबासाहेब कुमटकर , अर्जुन पवार , मल्हारी पारखे, किसन वराट, बळीराम अवसरे ,हरिदास पावणे , हरिभाऊ वराडे ,रामंचद्र गाढवे, रामेश्वर ढवळे, अभिमान घोडेस्वार, गणेश रोडे , दादा राऊत, संजय हजारे ,नानासाहेब मोरे , नवनाथ बहिर, गणेश शिंदे, गणेश नेटके सर, तुपसौंदर पोपट (नाना), नितीन शिंदे , किरण माने, प्रशांत कुंभार , अमोल रासकर , मारुती फड ,विजय जेधे सर , मनोज कांबळे, रविंद्र तांबे, सुनिल (मामा ) भामुद्रे, श्रीम.तारामती मोटे , श्रीम. चंद्रकला खरपुडे ( शिंदे ) मॅडम, छाया जाधव मॅडम , स्वाती सरोदे मॅडम व सर्व शिक्षकांच्या उपस्थित शुभेच्छा दिल्या.
चिमुकल्यांच्या कलाविष्कार अर्थात वार्षिक स्नेहसंमेलनास खूप खूप शुभेच्छा देऊन मिशन आपुलकी अंतर्गत शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी श्री. धनवे साहेबांनी पालकांना देणगी देण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रम सुरू होण्या पूर्वीच ग्रामस्थांकडून व पालकांकडून ४०,००० रुपयांची देणगी प्राप्त झाली. व संपूर्ण कार्यक्रमांत ३३,६७० रुपयांचे बक्षिस मुलांना देण्यात आले.
पवारवस्ती (पाडळी) लहान वस्ती असून सुध्दा कार्यक्रमाच्या अगोदरच ४०००० रुपयांचे देणगी देणारी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिली शाळा असेल असे उद्गार मा. गट शिक्षणाधिकारी धनवे साहेबांनी काढले.
संपूर्ण कार्यक्रमासाठी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( माध्य.) श्री. नागनाथजी शिंदे साहेबांनी ५००० रु. बक्षिस दिले . एकूण कार्यक्रमात ७३,६७० समाज सहभाग मिळाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल सातपुते सरांनी तर सुत्रसंचलन श्री. मनोजकुमार कांबळे , विजय जेधे व प्रशांत कुंभार यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे सरपंच सर्व सदस्य व ग्रामसेवक ग्रामपंचायत पाडळी , ग्रामस्थ व सर्व शिक्षकांचे आभार प्रदर्शन मुख्या. श्री जरांडे बाळू यांनी केले .