जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी ठेवण्याचे पाप भाजपा आमदाराचेच – सरपंच हनुमंत पाटील आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने सुरू केलेले टँकर शासनाकडून बंद

0
1403

जामखेड न्युज——

जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी ठेवण्याचे पाप भाजपा आमदाराचेच – सरपंच हनुमंत पाटील

आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने सुरू केलेले टँकर शासनाकडून बंद

 

मतदारसंघातील काही गावात सध्या तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई आहे. शासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही टँकर वेळेवर मिळत नाहीत. तेव्हा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने टँकर सुरू केले होते तेही भाजपा खासदार व आमदार यांनी अधिकारी वर्गाला सांगून बंद करावयास लावले आहेत त्यामुळे अनेक गावात तीव्र पाणीटंचाईचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. एकतर जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी ठेवण्याचे पाप भाजपा आमदाराने केले आहे असा आरोप साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांनी केला आहे.


जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी ठेवण्याचे पाप गेली पंचवीस वर्षे भाजपाच्या आमदारांनी केले आहे, आमदार रोहितदादा यांनी दुष्काळी ओळख मिटविण्यासाठी चार हजार विहिरी मंजूर करवून घेतल्या त्याची कामेही मोठ्या प्रमाणावर सुरू होती. पण त्याची चौकशी लावून खासदार विखे, आमदार शिंदे यांना काय साध्य करावयाचे आहे हे लक्षात येत नाही. जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी राहावा असेच खासदार विखे व आमदार शिंदे यांना वाटत आहे का❓ असे असेल तर येणाऱ्या निवडणूकीत जनता मतदानाच्या रूपाने दाखवून देईल.

सध्या मतदारसंघात रोजगार हमी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू होती. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सुमारे चार हजार विहिरी मंजुरी होती जेणेकरून काही प्रमाणात तरी दुष्काळ हटेल पण तेही सर्व बंद करून ऐन दुष्काळी परिस्थितीत जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कामाची चौकशी लावून केली आहे.

राम शिंदे साहेब तुम्ही लोकांना पाण्याचे टँकर देऊ शकत नाहीत, पण कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चाने चालू केलेले टँकर अधिकारी वर्गाला दम देऊन बंद करायला लावताय यावरून तुमची मानसिकता किती खालवली आहे हे तालुक्यातील जनतेच्या लक्षात येत आहे. आसा आरोपही सरपंच हनुमंत पाटील यांनी केला आहे.


जामखेड तालुका कायम दुष्काळी ठेवण्याचे पाप गेली पंचवीस वर्षे भाजपाच्या आमदारांनी केले आहे, आमदार रोहितदादा यांनी दुष्काळी ओळख मिटविण्यासाठी चार हजार विहिरी मंजूर करवून घेतल्या, त्याची चौकशी लावून खासदार विखे, आमदार शिंदे यांना काय साध्य करावयाचे आहे हे कळेना की यांना जामखेड तालुका नेहमी पाण्यापासून वंचीत रहावा असे वाटते का? जर असे असेल तर तालुक्यातील जनता या दोघाना मतदानातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. 

चौकट
मागील लोकसभा निवडणुकी आगोदर खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात अनेक ठिकाणी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले होते. लोकसभेचे मतदान झाले त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता सर्व टँकर बंद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here