जामखेड न्युज——
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती (शिऊर) शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती (शिऊर) चे तीन विद्यार्थी नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षेत मिशन आरंभ 2024 मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थी चमकले आहेत. यामुळे त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत आयोजित मिशन आरंभ (नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी) परीक्षा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवस्ती (शिऊर) इयत्ता 4थी चे 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत व 5 विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

इयत्ता चौथी जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
1) सारंग प्रदीप झुंजरुक (284 गुण जिल्हा – 4 था)
2) श्रेया बळी जायभाय (282 गुण जिल्हा- 5 वी)
3) वेदांत गणेश नेटके (258 गुण जिल्हा 17वा)

इयत्ता चौथी तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
1) भक्ती भरत काळे( 242 गुण तालुक्यात प्रथम)
2) सावी सुभाष नेटके (238 गुण तालुक्यात- दुसरी)
3) आराध्य परशुराम नागरगोजे (234 गुण तालुक्यात- चौथा)
4) श्रावणी गणेश कडू (224 गुण तालुक्यात- सातवी )
5) साक्षी कृष्णाजी कदम (174 गुण)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के.नरवडे, केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, केशव गायकवाड, विक्रम बडे, नवनाथ बडे, राम निकम, शिऊर गावच्या सरपंच गिरजाताई उतेकर, उपसरपंच प्रियंका तनपुरे, ग्रामपंचायत सदस्य बदाम निंबाळकर, आजीनाथ निकम, राजश्री लटके शिक्षणप्रेमी नागरिक सुशील काळे ,महादेव झरकर, नानासाहेब सावंत, शरद निकम, तुषार चव्हाण, नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





