रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा – आण्णासाहेब सावंत

0
811

जामखेड न्युज——-

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा – आण्णासाहेब सावंत

 

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या विरोधात विद्यार्थी व ग्रामस्थांनी दहा दिवस आंदोलन केले होते. यावेळी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा जणांची चौकशी समिती स्थापन करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यानुसार दि. १९ रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. यात रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष व संचालक मंडळावर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी केली.

रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या आर्थिक मानसीक शारिरीक शोषणा विरोधात जामखेड येथील तहसील कार्यालया सामोर १० दिवस आंदोलनं करत असताना, आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी माझी मंत्री तथा विद्यमान विधान परिषद सदस्य प्रा. राम शिंदे आले असता त्यांनी आंदोलनं स्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून तात्काल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली व समितीला १५ दिवसांत चौकशी अहवला सरकारला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.


त्या अनुषंगाने काल १९ रोजी जिल्हाधिकारी सालीमाठ यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली होती या बैठकीला सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ रायगड यांच्या चौकशी कमिटी , जिल्हा पोलीप्रमुख यांचे प्रतिनिधी, जिल्हा वन प्रमुख, रत्नदीप मेडिकल कॉलेजचे सर्व कोर्सचे प्रत्येकी दोन विद्यार्थी, उपोषण कर्ते पांडुरंग भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ उपस्थित होते.


या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी चौकशी समिती समोर आपले मत व्यक्त करतांना , विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक व पिळवणूक केल्या प्रकरणी रत्नदीप च्या अध्यक्षा सह संचालकांवर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली तसे निवेदन चौकशी समितीला दिले.


सर्व विद्यापीठांच्या चौकशी समित्यांनी एकाच वेळी चौकशी केल्यास यातील गौडबंगाल बाहेर येईल व सत्य सामोरं येईल अशी मागणी केली त्याची जिल्हाधीकारी यांनी तात्काळ दखल घेऊन त्याचं दिवशी लगेच तीनही विद्यापीठांच्या चौकशी समित्यांना एकाच वेळी चौकशी करण्यासाठी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चौकशी समितीच्या वतीने प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी निवेदन स्विकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here