जामखेड न्युज———
जामखेड तालुका शिक्षक समितीला पुन्हा खिंडार
संभाजीराव थोरात यांच्या शिक्षक संघात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच
जामखेड तालुका शिक्षक समितीला खिंडार पडले असून शिक्षक संघ संभाजीराव थोरात गटात जामखेड तालुका समितीचे अध्यक्ष नवनाथ बहीर, कार्याध्यक्ष अरुण मुरूमकर, सरचिटणीस विजय जेधे, गुरुकुल मंडळाचे माजी तालुकाध्यक्ष राम ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
नुकताच सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनी त्यांच्या साथीदारांसह शिक्षक संघात प्रवेश केला होता यानंतर सत्ता सोडून अनेक शिक्षक संघटनांचे नेते संभाजीराव गटात प्रवेश करत आहेत.शिक्षक संघ हा शिक्षकांच्या प्रश्नाला प्राधान्य देत असून शिक्षक नेते राम निकम, किसन वराट, नारायण राऊत यांची कार्यपद्धती पाहून शिक्षक संघात येण्याचा विचार केला यापुढे शिक्षक संघात राहून शिक्षक संघात काम करत राहणार असल्याचे नवनाथ बाहिर यांनी सांगितले.
शिक्षक बँकेत सध्या शिवाजीराव पाटील गटाची शिक्षक संघाची सत्ता आहे असे असताना सत्ता सोडून अनेक शिक्षक संभाजीराव गटात प्रवेश करत आहेत त्यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अजूनही येत्या काही दिवसात सत्ताधारी गटातील अनेक शिक्षक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे
दिनांक 4/3/2024 रोजी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा शिक्षक संघावर विश्वास दाखवून चांगल्या विचारा बरोबर काम करण्यासाठी शिक्षक समिती चे अध्यक्ष श्री नवनाथ बहीर कार्याध्यक्ष अरुण मुरुमकर सरचिटणीस विजय जेधे जिल्हा प्रतिनिधी राम ढवळे यांनी शिक्षक संघात प्रवेश केला आणि जामखेड तालुका संघमय करण्याचा निर्धार व्यक्त करून जामखेड तालुका शिक्षक नेते राम निकम किसन वराट नारायण राऊत यासाख्या नैतिक अधिष्ठान असणाऱ्या शिक्षक नेत्या च्या बरोबर काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे असे विचार सर्वांनी व्यक्त केले,
प्रवेशासाठी निरंतर प्रयत्न करणारे जामखेड तालुका अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी सर्वांनी संघात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
शिक्षक समितीच्या सर्व सदस्या ना प्रवेशित करण्यासाठी आवर्जुन जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सालके उपस्थित झाले त्यांचेही आभार राम निकम व किसन वराट यांनी मानले आता जामखेड तालुका संभाजीराव थोरातांच्या शिक्षक संघा बरोबर काम करून शिक्षकाचे विविध प्रश्न समन्वयाने सोडविण्यास कटिबद्ध राहील असे नारायण राऊत यांनी सांगितले प्रवेशा प्रसंगी विजयकुमार जाधव, रजनीकांत साखरे, अशोक घोडेस्वार, अभिमान घोडेस्वार, दत्तात्रय यादव, प्रदिप दळवी आदि उपस्थित होते.