मम्मी पेक्षा आई शब्दात अधिक गोडवा आहे – न्यायाधीश वैभव जोशी जामखेड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

0
516

जामखेड न्युज——

मम्मी पेक्षा आई शब्दात अधिक गोडवा आहे – न्यायाधीश वैभव जोशी

जामखेड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

मराठी ही जननी आहे. तिचा वापर आता न्यायालयीन कामकाजात पण होत आहे. मम्मी, माँम पेक्षा आई शब्दात मोठ्या प्रमाणात प्रेम जिव्हाळा आहे. एक दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा न करता दररोज गौरव करणे आवश्यक आहे. असे मत वैभव जोशी दिवाणी न्यायाधीश, जामखेड यांनी व्यक्त केले.

तालुका न्यायालय व वकील संघ जामखेड तसेच महाविद्यालय जामखेड संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन आज महाविद्यालयात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एल डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून
वैभव जोशी दिवाणी न्यायाधीश, जामखेड हे होते यावेळी नितीन घुमरे उपाध्यक्ष वकील संघ जामखेड, अँड अमोल जगताप , अँड.अल्ताफ शेख, अँड. कल्पेश गायकवाड, अनिल चव्हाण, प्रा. अविनाश फलके, प्रा. रत्नमाला देशपांडे, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना न्यायाधीश जोशी म्हणाले की, आपण परदेशात गेल्यावर एखादा मराठी बोलणारा दिसला तर आपणास त्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटतो असे जोशी यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे म्हणाले की, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र ही समृद्ध साहित्यिकांची खाण आहे. वेद संस्कृत मध्ये होते ते समजण्यासाठी सार उपनिषद तयार झाले नंतर गीतेत रूपांतर झाले यानंतर ज्ञानेश्वरी मध्ये सर्व काही मांडले. मराठी प्रगल्भ भाषा आहे. मराठी भाषेची सुरूवात अ पासून होते शेवटचे अक्षर ज्ञ आहे म्हणजे आपली भाषा अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी भाषा आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डोंगरे म्हणाले की, ज्या वयात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या वयात आपण वाचणे आवश्यक आहे. जीवनाचे सर्व सार ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. जीवनात प्रगल्भ होण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. कोवळ्या वयात योग्य संस्कार महत्त्वाचे आहेत. अंतःकरणापासून कोणतेही काम करा यश हमखास मिळणारच याचबरोबर चिंतन मनन करा असा सल्ला ही दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाकरे आर ए. तर प्रस्ताविक प्रा. घोगरदरे टी. ए. यांनी केले तर आभार प्रा. अविनाश फलके यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here