बिभीषण धनवडे यांचा सम्राट वॉरियर्स जेसीए प्रीमियर लीगच्या प्रथम पर्वाचा मानकरी

0
484

जामखेड न्युज——

बिभीषण धनवडे यांचा सम्राट वॉरियर्स जेसीए प्रीमियर लीगच्या प्रथम पर्वाचा मानकरी

परिसरातील तरूण खेळाडूंना प्रोत्साहन व संधी देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड शहरात क्रिकेट असोसिएशन व जामखेड प्रीमियर लीगच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त
क्रिकेट प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते यात नगरसेवक बिभीषण धनवडे यांचा सम्राट वॉरियर्सने अंतिम सामना जिंकत पहिल्या पर्वाचे मानकरी ठरले. याबद्दल बिभीषण धनवडे व संपूर्ण संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.


जामखेड क्रिकेट असोसिएशन आयोजित व आमदार रोहित पवार यांच्या सौजन्याने जे.सी.ए. प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले होते.


या क्रिकेट लीगच्या उद्घाटन प्रसंगी दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शहरातील महादेव मूर्ती पासून सकाळी नऊ वाजता भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली तसेच क्रिकेट मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आमदार रोहित पवार यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या जे. सी. ए प्रिमियर क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात, डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ.सुशील पन्हाळकर, डॉ. दिनेश रसाळ, डॉ. भरत दारकुंडे, युवा नेते संदीप गायकवाड, सुनील जगताप, अँड. घनश्याम राळेभात, अशोक शेळके, योगेश नाईक, विनोद नवले, महादेव काळे, हवाशेठ सरनोबत, विनायक राऊत, अँड संग्राम पोले, सागर अष्टेकर, गणेश म्हेत्रे, महेश राळेभात, संभाजी वराट, पप्पू फिटर, गणेश खाडे हिरामोती पान सेंटर आदींनी
विशेष सहकार्य केले.


सम्राट वॉरियर्स, शंभूराजे सुपर किंग्स, हाजी
स्पोर्ट्स, सावकार इलेव्हन, मामा बॉस, ए. के. सुपर किंग्स, मेजर इलेव्हन (जायभायवाडी), जाणता राजा (नान्नज) हे आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

अंतिम सामन्याचा सामनावीराचा किताब सागर इंगळे यांनी पटकाविला. या क्रिकेट लीग स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे. सी. ए चे अध्यक्ष अँड. प्रमोद राऊत, उपाध्यक्ष नानासाहेब बाबर (मेजर), सचिव सागर जगताप, खजिनदार उमेश खूपसे, सदस्य बापू काटकर, सोनू कदम, शकील शेख तसेच शंभूराजे क्रिकेट क्लब आदींनी परिश्रम घेतले.


चौकट

तरुण खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. स्पर्धेची सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे या पहिल्या पर्वासाठी आठ संघ सहभागी झाले होते.जामखेड येथील खेळाडू व प्रेक्षकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here