जरांगे पाटलाच्या आदेशाने उद्या जामखेड राहणार कडकडीत बंद

0
881

जामखेड न्युज——

जरांगे पाटलाच्या आदेशाने उद्या जामखेड राहणार कडकडीत बंद

 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड चौकात उद्या जामखेड बंदचा फलक लावण्यात आला आहे. यामुळे जामखेड कडकडीत बंद राहिल असे सांगण्यात आले आहे.


जरांगे पाटील यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आणि पाटलांचा आदेश हाच आमच्या साठी सर्व काही असे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे उद्या जामखेड कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे. उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे, वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी.


जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांचा आदेश मराठा समाजासाठी सर्व काही म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे तसा बंदचा बोर्ड जामखेड शहरातील जयहिंद चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here